भारतीय रेल्वे सल्लागार समितीवर चंद्रकांत कंखरे यांची सदस्य पदी नियुक्ती
![]()

भारतीय रेल्वे सल्लागार समितीवर चंद्रकांत कंखरे यांची सदस्य पदी नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
भाजपा पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कंखरे यांची भारतीय रेल्वे सल्लागार समिती ,अमळनेर या कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडी बद्दल खासदार उन्मेष दादा , मा.आमदार स्मिता ताई ,व मित्र परिवार यांनी अभिनंदन कौतुक केले
सामान्य प्रवासी च्या समस्या रेल्वे प्रशासनाला कळाव्यात या साठी सल्लागार समिती ची निर्मिती केंद्र सरकारने केली आहे.
या समिती वरील सदस्य रेल्वे प्रशासनाला नागरी हिताच्या सूचना देतील.
प्रवाशांनी आपल्या सूचना व समस्या मांडाव्यात जेणे करून रेल्वे प्रशासनाला त्या मांडता येतील,असे आव्हान चंद्रकांत कंखरे यांनी केले आहे

