श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ,उधना सुरत, गुजरात च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जन्म जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
![]()



श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ,उधना सुरत, गुजरात च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जन्म जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली व त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन करण्यात आले…!
(सुरत प्रतिनिधी प्रा.विलास माळी)
अनंत अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसेविका शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री, आशिया खंडातील प्रथम शिक्षिका, कवयित्री, थोर समाज सुधारक, ज्ञानज्योती, शिक्षण प्रसारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सर्वप्रथम त्यांच्या जन्म जयंती निमित्त विनम्र अभिवादन….!
घडलो नसतो मी जर,
शिकली नसती माझी माय,
जर नसत्या सावित्रीबाई तर,
कशी शिकली असती माझी माय
दिनांक ०३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्म जयंती. संपूर्ण भारतात महिला मुक्ती दिन व बालिका दिन म्हणून साजरी करण्यात येते.
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे. त्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत. बालविवाहावर बंदी, विधवांवरील अत्याचाराला लगाम लावणे आणि महिलांच्या कल्याणाचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजेच स्व कर्तुत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा या थोर समाज सुधारक व शिक्षण प्रसारक मातेस व त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास त्यांच्या १९३ वी जन्म जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी दिनांक ०३ जानेवारी २०२४ वार- बुधवार रोजी सुरत येथील माळी समाज मंगल कार्यालयात(वाडीत) प्लॉट नं. ७६,७७ आस्तिक नगर, संजय नगरच्या बाजूला,लिंबायत,उधना,सुरत येथे आईसाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तरी सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लासूर ता.चोपडा जि.जळगाव येथील,सामाजिक बांधिलकी जोपासणारे,ज्येष्ठ समाज बांधव व सामाजिक कार्यकर्ते, समाजभूषण,समाज प्रेमी,सन्माननीय आबासो.श्री. हिम्मतराव रामदास माळी(गुरुजी) यांची सहकुटुंब उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित उधना,सुरत,(गुजरात) येथील श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळाचे सेक्रेटरी प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर उपाध्यक्ष.श्री.भिकन दगा महाजन खजिनदार श्री.अशोक तानाजी उपसेक्रेटरी श्री.एकनाथ दगा महाजन सदस्य श्री.विजय तुकाराम महाजन समाज बांधव श्री.अतुल गोकुळ महाजन महाजन,श्री.मधुकर वना महाजन तसेच महिला मंडळ,सुरत च्या सेक्रेटरी सौ.लताबाई विठ्ठल महाजन,उपाध्यक्ष सौ.संगीताबाई कैलास महाजन सदस्य सौ. ठगूबाई युवराज महाजन,सदस्य गं.भा.ज्योती सुनील महाजन,सदस्य सौ.सुनिता रामदास महाजन,सदस्य सौ. ज्योती मधुकर माळी व सर्व समाज बांधव व माता-भगिनीं बाळ गोपाळ तसेच फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे, समाजप्रेमी, सन्माननीय आबासो.श्री. हिम्मतराव रामदास माळी(गुरुजी) यांनी सदिच्छा भेट म्हणून श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, सुरत ला रोख रक्कम रुपये ११०१/- (अकराशे एक रुपये) तसेच श्री क्षत्रिय काच माळी समाज महिला मंडळ,सुरत ला रोख रक्कम रुपये ११०१/- (अकराशे एक रुपये) सदिच्छा भेट म्हणून वर्गणी दिली. व आपल्या मनोगतातून मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देऊन प्रेरणा दिली. उपस्थित प्रमुख पाहुणे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आभार उधना,सुरत,(गुजरात) येथील श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ व महिला मंडळ च्या वतीने मानण्यात आले. याप्रसंगी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे, सर्व समाज बांधवांचे माता-भगिनींचे आभार तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय व सामाजिक तसेच शैक्षणिक कार्याविषयी माहिती उधना,सुरत,(गुजरात) येथील श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळाचे सेक्रेटरी व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघाचे सुरत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ,उधना,सुरत,(गुजरात)
सुरत जिल्हा संपर्कप्रमुख
अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ कार्यक्षेत्र भारत देश शाखा- गुजरात.

