1 min read

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा लढा हाच खरा इतिहास ठरतो.
मुकुंद सपकाळे

Loading

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा लढा हाच खरा इतिहास ठरतो.
मुकुंद सपकाळे
जळगांव प्रतिनिधी-समाज व्यवस्थेतील वर्षानुवर्षांपासूनची गरीब व श्रीमंतातील दरी तसेच कामगार, मजूर, श्रमिक, दलित, वंचित यावर होणारा अन्याय आणि प्रस्थापित समाज व्यवस्थेने लादलेली गुलामी या विरुद्धचा असणारा संघर्ष आणि संघर्षातून मांडली गेलेली वास्तव परिस्थिती हाच खरा इतिहास असू शकतो आणि या इतिहासातून धडे घेत विद्रोहाची मशाल हाती घेऊन आपल्याला हा संघर्ष विद्रोही संमेलनाच्या माध्यमातून पुढे न्यावयाचा असून यासाठी आपल्या सर्वांची संघर्ष नायक म्हणून असणारी भूमिका संमेलनाच्या माध्यमातून व्यक्त होणार असल्याचे मत विद्रोही साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी विद्रोही संमेलनाच्या निमित्ताने आयोजित बैठकी प्रसंगी व्यक्त केले. संमेलनाचे संयोजक डॉ. मिलिंद बागुल यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेतील मूठभर लोकांनी चैन,विलासी आणि मनोरंजनासाठी श्रमिकांचा शेतमजुरांचा, वंचितांचा, कामगारांचा, नोकरदारांचा आणि एकूणच महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची चालवलेली उधळपट्टी या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी खऱ्या अर्थाने तळागाळातल्या सामान्य माणसाचे साहित्य हे समाज व्यवस्थेतील पुढच्या पिढीपर्यंत येण्याकरता विद्रोही संमेलन आवश्यक असल्याचे मत मांडत जनतेचा पैसा उधळणाऱ्या अशा राज्यकर्त्यांना, साहित्यिकांना रोकण्यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसांनी अशा संमेलनाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत मांडत पुढे येण्याचे आवाहन केले पिढी जात वर्षानुवर्षांपासून मराठी साहित्य संमेलनाच्या नावावर मराठी भाषकांची, मराठी माणसाची दिशाभूल करत पिळवणूक चालल्याचे मत देखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी केले सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार महेंद्र केदारे यांनी मानले. विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी मुकुंद सपकाळे यांची निवड झाल्याबद्दल शिरीष अडकमोल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला प्रकाश दाभाडे, विजयकुमार मौर्य, रमेश सोनवणे, वाल्मीक सपकाळे,भाऊराव इंगळे,दिलीप सपकाळे ,सुनील सोनवणे, अनिल सुरडकर, आकाश सपकाळे व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *