1 min read

अनिल बोरनारे यांच्या कार्यावरील कॅलेंडर चे आशिष शेलारांच्या हस्ते प्रकाशन

Loading

अनिल बोरनारे यांच्या कार्यावरील कॅलेंडर चे आशिष शेलारांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई शिक्षक मतदारसंघातील कार्याचा दिनदर्शिकेत समावेश

२० हजार शिक्षकांना होणार वाटप

मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी मुंबईतील शिक्षकांसाठी केलेल्या कार्यावर आधारित असलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. दादर येथील मुंबई प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रकाशनास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी मंत्री कृपाशंकर सिंग विनोद शेलार विजय धनावडे आदी उपस्थित होते.
अनिल बोरनारे मागील २५ वर्षांपासून मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर लढा देत असून हजारो शिक्षकांच्या सेवाशर्तीचे प्रश्न त्यांनी सोडविले आहे.
शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी, विना अनुदानित शाळांना अनुदान मिळावे, सरकारी कर्मचाऱ्यांसमवेत सातवा वेतन आयोग मिळवून देणे, महिला शिक्षकांना केंद्राप्रमाणे बाल संगोपन रजा मिळवून देणे, शिक्षकांचे १ तारखेला वेतन मिळवून देणे, शाळा सुटल्यावर मुंबईतील शिक्षकांना विनाकारण थांबविणे बंद केले. शिक्षकांना रोज काढाव्या लागणारे लेसन प्लॅन, पाठ टाचण बंद केले. दरमहा शिक्षकांना सॅलरी स्लिप मिळवून दिली. मुंबईतील १२०० शिक्षकांना ४६ कोटी मिळवून दिले. मुंबईतील ११४२ अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करण्यास शिक्षण विभागाला भाग पाडले. वेतन निश्चिती मधील भ्रष्टाचार थांबविला. शिक्षकांची भरती बंदी उठविली यासह शिक्षक-शिक्षकेतरांचे शेकडो प्रश्न अनिल बोरनारे यांनी सोडविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *