1 min read

ढेकू खुर्द ता.अमळनेर येथील तरणाई गावाच्या विकासासाठी आले एकत्र….

Loading

ढेकू खुर्द ता.अमळनेर येथील तरणाई गावाच्या विकासासाठी आले एकत्र….

गावातील तरूणांनी एकत्र येऊन “एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन केली विकास मंचाची स्थापना

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
बाहेर गावी व बाहेर देशात नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.
“एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन. दि.२४/१२/२०२३ रोजी ग्राम विकास मंचाची सुरवात समाज प्रबोधक व्याख्याना तसेच मंचाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. गावाच्या विकासासाठी सर्व तरुणाई एकत्र आली असून येणाऱ्या काळामध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबवले जाणार आहेत असे यावेळी मान्यवरांनी बोलूण दाखवले.
प्रमुख पाहुणे सचिन देवरे तर
कार्यक्रमाला ऑनलाइन मिटिंग द्वारे
अमेरिकेतून पंकज पाटील
महाराष्ट्रातून प्रशांत पाटील,निखिल पाटील,अनिल पाटील, हर्षल पाटील, हर्षल मोरे, मयूर पाटील, योगेश पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमात ग्राम विकास कार्यकर्त्यांनी त्यांच्या हस्ते निबंध स्पर्धा विजेते विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह वाटप देखील केले.कार्यक्रमाला काही कार्यकर्ते अमेरिका, गुजरात आणि महाराष्ट्रातून वेब मीटिंग द्वारे विकास मंचाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते.
सर्व ढेकु खुर्द येथील ग्रामस्थानी मोठ्या उत्साहाने ग्राम विकास मंचाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले व पुढील विकास कामांसाठी शुभेच्या दिल्या.

जाहिरात…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *