1 min read

विद्यार्थ्यांवर विद्यार्जन व संस्कार करणारी वसुंधरा ताई निवृत्त !!

Loading

विद्यार्थ्यांवर विद्यार्जन व संस्कार करणारी वसुंधरा ताई निवृत्त !!

सौ .वसुंधराताई लांडगे
सस्नेह नमस्कार…
तुम्ही करत असलेल्या कुशल नि पवित्र अध्यापन कार्यातून शासनाच्या ठरविलेल्या नियतवयोमानानुसार तुमच्या सेवेची सांगता करित आहात त्याबद्दल तुम्हाला बंधू या नात्याने आमच्या परिवाराकडून हार्दीक हार्दीक शुभेच्छा!

अडचणी असल्या म्हणून
जीवन काही खोळंबून
राहत नाही ,हे आपण
आपल्या सूर्योन्मुखी
कमळासारख्या जगण्यातून दाखवून दिले..
आयुष्याच्या खडतर प्रवासात उच्च शिक्षणाची आस मनाशी बाळगून तुम्ही अडथळ्यांची शिखरे हसतमुखाने पार केली आणि तुमचे ईप्सित ध्येय अखेर साध्य केले.
तुमच्या संसाराच्या प्रांगणात दोन पणती असतांना दिव्याची अपेक्षा ठेवली नाही..
आदरणीय ताईची माया सर्वांवर सारखी आहे. ताईंनी नावाप्रमाणे वसुंधरा म्हणजे पृथ्वी जी सर्वच लोकांवर समान माया करते त्याप्रमाणेच ह्या ताईवर दोन्ही मुली,जावई, नातवंडे यांनी ताई व नानांवर सदैव प्रेम केले. मुली व जावई यांनी ताई व नानांना मुलाची उणीव जाणवू दिली नाही. ताई नानांनी जावई लोकांवर मुलाप्रमाणे प्रेम केले.
ताई व नानासाहेब यांना समाज, मित्र, आप्तेष्ट, सहकारी ,हितचिंतक सुख दु:खात सोबत राहिले. अमाप प्रेमाचा, आपुलकीचा वर्षाव ह्या कुटुंबावर केला.
तुम्ही उच्च शिक्षणाची पायरी चढत मुलींवर संस्काराचे शिंपण कमी पडु दिले नाही. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांवर करुणेचा, ज्ञानाचा, स्नेहाचा वर्षाव केला. अफाट रंगबेरंगी,भौतिक दुनियेत स्वत:चे अस्तित्व जपून ठेवले. तुमचा संगीताचा छंद मनमुरादपणे घेऊन इतरांना पुलकित करण्याचा अप्रतिम प्रयास केला.
तुम्ही प्रेमळ स्वभावाने व मनी विनम्र भाव ठेवून सारे अमळनेर जिंकले.तुमच्या ह्या निर्मळ प्रेमाच्या बचतीवर अनेक महत्वाची पदे तुमच्या पर्यत
चालत आली. त्या पदाची, खुर्चीची शान तुम्ही वाढविली. साहित्यातील रूचीने तुम्हाला मराठी वाङमय मंडळात चमक दाखवण्याची संधी चालत आली.
खान्देश शिक्षण मंडळात तुमच्या निवडीची हॅट्ट्रीक झाली. पुरस्कार तुमच्या शोधात तुमच्या पर्यंत आलीत..
तुमच्यावर शुभेच्छांची अविरत बरसात होत राहीली. अहिल्यामाई तर आम्हाला पाहता आल्या नाहीत, पण तुमच्यारुपाने अहिल्यामाई आम्हाला मिळाल्या..सदैव हसतमुख राहुन तुम्ही समोरच्यात हसू फुलविले..तुमच्या पाठिमागे राजासारख्या दशरथाची साथ होती म्हणून असंख्य विद्यार्थीरूपी रामाच्या कौशल्या तुम्ही बनल्या..तुमच्या सारखी बहिण लाभल्याने माझी भाऊबीज तेजोमय ,दिव्य बनली. विवेकी,वैज्ञानिक वृत्ती तुमच्या स्वभावाची धाटणी आहे. शिवधर्म पध्दतीने लग्न लावुन सत्यशोधक जोतिबाचा वसा जपला.
तुमच्या ह्या सुंदर कारकिर्दीचा शेवट न होता समाजाचे पालकत्व सांभाळून प्रबोधनाचे काम कराल यात शंका नाही. ताई तुमचे निरागस आयुष्य निरामय, सुखद, सुकर, सुंदर व प्रेरक राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना!! आपला स्नेहाकिंत...

श्री ईश्वर आर महाजन
पत्रकार अमळनेर

9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *