1 min read

जळगावच्या सुप्रसिद्ध कवयिञी व समाज सेविका मा.इंदिरा जाधव यांना नेपाळचा आंतरराष्ट्रीय मानवता पुरस्कार सन्मानपूर्वकप्रदान

Loading

जळगावच्या सुप्रसिद्ध कवयिञी व समाज सेविका मा.इंदिरा जाधव यांना नेपाळचा आंतरराष्ट्रीय मानवता पुरस्कार सन्मानपूर्वकप्रदान
26 डिसेंबर 2023 रोजी काठमांडू नेपाळ येथे ञिभुवन विद्यापीठ मध्ये पुष्परत्न साहित्य समूह नाशिक, गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा व कविसंमेलन आयोजित केला होता.कार्यक्रमाचे उद्घाटक नेपाळ देशाचे पहिले उपराष्ट्रापती मा. प्रेमानंद झा होते तर कार्यक्रमाध्यक्ष मा.लाल बहादुर राणा,संस्थापक, अध्यक्ष,गांधी पीस फाउंडेशन नेपाळ व प्रमुख पाहुणे मा.लामा घ्यानचो रिनपोचे,संस्थापक व अध्यक्ष,विश्व बुदिष्ट फेडरेशन, नेपाळ,लेखक मा. चंद्रकुमार शर्मा(नेपाळ)मा.बी.एन.खरात, अध्यक्ष, इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर, भारत असे विविध मान्यवर उपस्थित होते .या मान्यवरांच्या शुभ हस्ते मा.इंदिरा जाधव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.महाराष्ट् व गोवा राज्यातील एकूण 80च्या वर साहित्यिक, कवी, कवयिञी उपस्थित होते तर नेपाळ देशातील अभ्यासक उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.आनंद रत्नाकर आहिरे,अध्यक्ष पुष्परत्न साहित्यसमूह नाशिक व संचालक आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी,नाशिक यांनी केले असून संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मा.मनिषा कापुरे नाशिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *