मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त !!
![]()

मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त !!
प्रत्येक व्यक्तीला जन्म एकदाच मिळतो. त्याचे सोने करायचे की कवळी करायची हा हिशोब आपल्याला करावा लागतो. इतिकर्तव्यतेची कधी ना कधी सांगता करावी लागते विहित वयोमानानुसार सेवानिवृत्ती अनिवार्य असल्याने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सुरु होणा-या आयुष्याच्या दुस-या इनिंगसाठी शुभेच्छा देणारा व त्यांच्या आजवरच्या कामाचा यथोचित गौरव करणारा निरोप समारंभ हा त्या कर्मचा-याच्या आयुष्यातील अत्यंत समाधानाचा क्षण असतो….
सर्वांना घेऊन चालणारे संजय भाऊसाहेब हे 1 जानेवारी 2024 ला सेवा निवृत्त होत आहे.
आयुष्याचा प्रत्येक
प्रवास भाऊसाहेब यांनी हसत, कुणालाही न दुखवता सर्व सहकार्यांना
सुख आनंद देणारा असा केला.
अत्यंत मितभाषी, अभ्यासू व संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त भाऊसाहेब संजय हिंमतराव साळुंखे.वरीष्ठ लिपीक,सु.हि.मुंदडे हायस्कूल वश्रीम.द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयात एकूण सेवा- 33 वर्षे 1 महिना झाली.भाऊसाहेब यांनी अत्यंत इमानेइतबारे सेवा केली. शाळेत व महाविद्यालयात काम करत असतांना कधीही आपल्या कामाचा कंटाळा केला नाही.. भाऊसाहेब यांनी सेवानिवृत्तीनंतर एक संकल्प केला आहे. नेत्रदान करायचा… हा त्यांचा स्तुत्य असा उपक्रम आहे आपण समाजाचे देणे लागतो… आपण काहीतरी दिल पाहिजे या भावनेने त्यांच्या ही संकल्पना व मनातील भावना बोलून दाखवल्या…
सेवानिवृत्तीचा दिवस आला.. अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला.. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं… तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे.. भाऊसाहेब साहेब आपली छवी सर्वांच्या हृदयात कायम राहिल..आपण जातांना म्हणावेसे वाटेल..”आज घेऊया निरोप आपण विरह दाटतो उरी, असु दया प्रेमच सर्वांवरी “माणूस जन्माला येतो त्याचे कर्तव्य मागे सोडून जातो. ही त्याची गुंतवणूक असते. ती जेवढी जास्त तेवढे आपुलकी, स्नेह, प्रेम याचे निरंतर सव्याज साठा मिळत जाते. त्याचप्रमाणे भाऊसाहेब, आपण जगलात ..आपल्याला भावी जीवनाच्या मंगलमय शुभेच्छा!!
शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन
पत्रकार अमळनेर

