1 min read

दिव्यांग विद्यार्थ्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधत जिल्हा समन्वयक सुषमाताई इंगळे यांनी दिली स्वखर्चाने व्हील चेअर

Loading

अमळनेर प्रतिनिधी-आज दिनांक 29/12/2023 रोजी समावेशित शिक्षण विभाग जळगाव जिल्हा समन्वयक श्रीमती.सुषमा इंगळे मॅडम यांनी जिल्हा परिषद शाळा खोकरपाठ येथील दिव्यांग विद्यार्थी शैलेश अरुण भिल इयत्ता 1 ली बहुविकलांग विद्यार्थी या दिव्यांग विद्यार्थ्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या स्वखर्चाने व्हील चेअर घेऊन आपल्या हस्ते भेट दिली. आणि विद्यार्थ्याची शाळेत येण्या-जाण्याची सोय करून दिली.त्याबद्दल गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री रावसाहेब पाटील यांनी जिल्हा समन्वयक श्रीमती. सुषमा इंगळे मॅडम यांचा सत्कार केला. सोबत विशेष शिक्षक शितल भदाणे, रेखा वारडे, सोनाली पिंगळे, सुनिता पाटील,किशोर पाटील, मोहन मराठे, हंसराज पाटील, अमोल पाटील विषय तज्ञ तुषार पाटील, फापोरे केंद्राचे केंद्र प्रमुख राजेंद्र गवते सर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *