1 min read

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर थाळी नाद व लाटणे मोर्चा !

Loading

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर थाळी नाद व लाटणे मोर्चा !

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दि ४ डिसेंबर पासून बेमुदत संप विविध मागण्यांसाठी सुरू असून नागपूर हिवाळी अधिवेशनात या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीमार्फत महाराष्ट्रभर जिल्हा परिषद कार्यालयांवर धरणे मोर्चा निदर्शने आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .त्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद कार्यालया वर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आक्रोश मोर्चाचे दिनांक 26 रोजी कार्यालयावर आयोजन केलेले आहे .
या आहेत मागण्या—–
१ )अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा देऊन सेविकांना तृतीय श्रेणी व मदतनिसांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी . २ ) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युईटी कायदा लागू करण्यात यावा . ३)सेवानिवृत्त झालेल्या सेविका मदतनिसांना सेवानिवृत्तीचे एक रक्कर्मी रक्कम ताबडतोब देण्यात येऊन त्यांची उपासमार थांबवावी . ४ ) अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधनाच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मरेपर्यंत देण्यात यावी . ५ )अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामकाजासाठी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे त्यांना नवीन मोबाईल ताबडतोब देण्यात यावे . ६ ) ईयत्ता १० वी पास झालेल्या सेवाजेष्ठ मदतनीस यांना अंगणवाडी सेविकांच्या पदी थेट नियुक्ती देण्यात यावी . ७) सेवा जेष्ठअंगणवाडी सेविकांना इयत्ता दहावी पास दहा वर्षाचा अनुभव वयाचे अट न ठेवता त्यांना थेट पर्यवेक्षिकांची नियुक्ती देण्यात यावी ८ ) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसापासून प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही तो ताबडतोब देण्यात यावा .९ ) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार दिवाळीच्या अगोदर दिवाळी भाऊबीज व गणवेशाची रकम अगोदर सेविका मदतनीस त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे होती ती रक्कम बरेच प्रकल्पात अद्याप आज पर्यंत मिळालेली नाही . ती ताबडतोब मिळावी या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ‘जिल्हा परिषद जळगाव कार्यालयावर थोडी नाद मोर्चा व धरणे आंदोलन कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे .ता.26 डिसेंबर रोजी मंगळवारी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान जिल्हा परिषद समोर जळगाव येथे दुपारी अकरा वाजेपर्यंत सेविका मध्ये सांनी जमून एक वाजता जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा ने जावयाचे आहे . जळगाव जिल्ह्यातील सर्व सर्व अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सर्वांनी संपूर्ण ताकदीने मोर्चा हजर राहून मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे पदाधिकारी भानुदास पाटील संघटक सचिव सौ .सुषमाताई चव्हाण जिल्हाध्यक्षा ‘सौ प्रेमलताबाई पाटील जिल्हाध्यक्षा आयटक . अमृत महाजन आयटक यानी एका प्रसिद्धी पत्रकान्वये आवाहन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *