1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव येथे आंतरकुल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव येथे आंतरकुल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.

जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात येत्या २९ व ३० डिसेंबर २०२३ दरम्यान स्नेह संमेलन- युवास्पंदन २०२३चे आयोजन करण्यात आलेले आहे. यात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी नानाविध स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आंतरकुल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत मुलींच्या २ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मुलांचे एकूण १८ सामने खेळविण्यात आले. पहिल्या उपांत्य सामन्यात पायरेट्स ११ या संघाने एसव्हीकेएम पॉवर हीटर्स या संघावर विजय मिळवून अंतिम स्पर्धेत प्रवेश मिळविला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये एक्स्ट्रिम ब्लास्टर या संघाने रायझिंग स्टार या संघावर विजय मिळवून अंतिम सामन्यात स्थान मिळविले. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात पायरेट्स ११ संघाने एक्स्ट्रिम ब्लास्टर संघावर बाजी मारून मोठया दिमाखात स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर मुलीच्या अंतिम सामन्यात इ.१२वीच्या मुलींच्या संघाने इ.११वीच्या मुलींच्या संघास हरवून विजेतेपद पटकावले. अंतीम सामन्यासाठी प्रा.सूर्यकांत बोईनवाड व प्रा.प्रमोद भोई हे पंच होते तर प्रा.गुणवंत वंजारी यांनी समालोचन केले. संपूर्ण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रा.विनोद वैदकर व समिती सदस्य प्रा. सूर्यकांत बोईनवाड, प्रा. प्रमोद भोई, डॉ.अतुल इंगळे, प्रा.योगेश धनगर यांनी परिश्रम घेतले.
अंतीम सामन्याच्या वेळी महाविदयालयाच्या उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील,क्रीडा संचालक डॉ.रणजीत पाटील व स्नेह संमेलन युवास्पंदनचे प्रमुख प्रा.महेंद्र राठोड व उपप्रमुख प्रा.शोभना कावळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *