1 min read

कळमसरे येथील गणेश नाना व रमेश आबा चौधरी यांना मातृशोक

Loading

कळमसरे येथील गणेश नाना व रमेश आबा चौधरी यांना मातृशोक

गं.भा.लटकनबाई चौधरी यांचीअंत्ययात्रा उद्या दिनांक २६ डिसेंबरला दुपारी २ वाजता निघणार अंत्ययात्रा…

अमळनेर प्रतिनिधी-
आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आई हा एकच शब्द आयुष्यभर जपून ठेवला, तरी काहीतरी राहतंय, अशीच जाणीव करून देणारा आहे. आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, तरी आईची महती लिहून पूर्ण केली जाऊ शकत नाही. आई मुलांवर संस्कार करते, शिकवते, स्वावलंबनाचे धडे देते; प्रसंगी मुलांसाठी वाटेल ते करायला ती तयार असते. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदीच खरे आहे. आईचं ममत्व प्रत्येकाला कळते.. कळमसरे येथील नानासो गणेश चिंधा चौधरी व आबासाहेब रमेश चिंधा चौधरी यांनी आपल्या आईची खूपच सेवा केली.. आईचा स्वभाव सोज्वळ व प्रेमळ होता..
दोन्ही मुलांवर योग्य शिक्षणाचे बाळकडू दिले.. त्यांनी ही आपल्या मुलांना योग्य शिक्षण देत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःच्या ठसा उमटवला आहे.
कळमसरे येथून श्री गणेश चिंधा चौधरी. व रमेश चिंधा चौधरी यांच्याकडून कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की आमच्या मातोश्री ग.भा. लटकन आईनां वयाच्या १०० व्या वर्षी आज दि. २५ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी ३ वा.देवाज्ञा झाली. तरी अंत्ययात्रा उद्या दिनांक २६ डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी २ वां राहत्या घरून निघेल.
आपले शोकाकुल
पितांबर पूना चौधरी
गणेश चिंधा चौधरी
रमेश चिंधा चौधरी (गोपीचंद दगडू चौ.)
समस्त करणकाळ परिवार कळमसरे ता.अमळनेर.

(मराठी लाईव्ह न्युज व महाराष्ट्र पत्रकार संघ ,ओबीसी शिक्षक असोसिएशन, महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव देवळी यांच्या वतीने लटकन आईंना भावपूर्ण श्रद्धांजली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *