देवगांव येथील महात्मा फुले हायस्कुलमध्ये गणित दिवस साजरा..
![]()


महात्मा फुले हायस्कुल येथे गणित दिवस साजरा..
अमळनेर प्रतिनिधी-महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव देवळी ता.अमळनेर आज भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त गणित दिवस साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यां मध्ये असलेली गणित विषयी भिती,त्यांना गणित सोडवतांना येणाऱ्या अडचणी या विषयी योग्य मार्गदर्शन गणित शिक्षक एस.के.महाजन यांनी सांगितले.
गणित शिक्षक एस.के.महाजन यांनी गणितज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन केले..
मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.गणितातील संकल्पना स्पष्ट केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.
यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर महाजन,एच.ओ.माळी, अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी संभाजीराव पाटील,गुरूदास पाटील उपस्थित होते

