न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘राष्ट्रीय गणित दिवस ‘साजरा…
![]()

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘राष्ट्रीय गणित दिवस ‘साजरा…
अंमळनेर :- आज रोजी महान गणितज्ञ रामानुजन यांच्या जयंती दिनानिमित्त न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल अमळनेर येथे राष्ट्रीय गणित दिवसाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस महान गणितज्ञ, आधुनिक काळातील महानतम गणित विचारक, विश्लेषक व संख्या सिद्धांत क्षेत्रात महानतम योगदान देणारे, बुद्धिमत्ता, प्रतिभा व आपल्या अथक चिकाटीने गणिताच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात माँ.सरस्वती व रामानुजन यांच्या प्रतिमांचे पूजन मा. प्राचार्य प्रेरणा पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नर्सरी तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली.
यात नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीअंक बोलून दाखविले तर ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी गणितात वापरले जाणारे विविध आकारांच्या परिचय करून दिला. तसेच सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी गणितात वापरल्या जाणाऱ्या विविध चिन्हांचा परिचय करून दिला. कार्यक्रमात रंगत यावी म्हणून प्रायमरीच्या विद्यार्थ्यानी विविध गीतांवर सुंदर नृत्य सादर केलीत.
आजच्या दिवसाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी रामानुजन यांच्या जीवनावरील विविध प्रसंगांचे वर्णन केले. यानंतर गणितावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.ज्यात विद्यार्थ्यांचे चार गट करण्यात आले होते. अग्नि समूह, पृथ्वी समूह, आकाश समूह व वायु समूह. या स्पर्धेत सर्वाधिक 15 अंक प्राप्त करत पृथ्वी समूहाने प्रथम तर अग्निसमूहाने द्वितीय स्थान पटकाविले.
विद्यार्थ्यांना मा. प्राचार्या प्रेरणा पाटील मॅडम, विज्ञान व गणिताचे शिक्षक वैभव आढाव, अमोल पाटील व जागृती महाजन मॅडम, भाग्यश्री पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ शिरसाठ सर, समृद्धी पाटील व निधी पवार यांनी केले.
विद्यालयाचे अध्यक्ष मा.शितल देशमुख सर, व चेअरमन निलेश लांडगे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच शिक्षकांनी अथक मेहनत घेतली.

