अमळनेर ते शेगांव महिला पायी वारीचे आयोजन…
![]()
अमळनेर ते शेगांव महिला पायी वारीचे आयोजन…
27 डिसेंबर ते 4 जानेवारी 2024 पर्यंत वारीचे नियोजन..

महिला भक्त वारीत येणार असाल तर संपर्क साधण्याचे आवाहन-सौ ज्योतीताई पवार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर येथील जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिर येथील अमळनेर ते शेगाव महिला पायी वारी 27 डिसेंबर ते 4 जानेवारी 2024 च्या दरम्यान जाणार आहे. तरी ज्या महिलांना वारीत यायचे असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन वारी प्रमुख सौ ज्योती राजेंद्र पवार यांनी केले आहे..
दिनांक 27 डिसेंबर2023 रोजी बुधवारी सकाळी पाच वाजता संत गजानन महाराज मंदिर जीएम सोनार नगर अमळनेर येथून पायी वारीची सुरुवात होईल.. त्या अगोदर सकाळी पाच वाजता महाआरती होईल.
महिला वारीमध्ये झालेल्या महिलांना किट दिले गेले आहे.. महिला वारीत कावपिंप्री मारवड ,सबगव्हाण, करणखेडा, पिंगळेवाडे मेहरगाव, खेडी, पातोंडा, खापरखेडा, मुसळी, जळगाव ,मुंबई येथील महिला वारीत जाणार आहेत. जवळपास 200 महिला वारीत जाणार असून हे पाचवे वर्ष आहे असे वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी सांगितले..
27 डिसेंबर ते 4 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये महीला वारीसाठी सकाळचा नाश्ता ,दुपारचे जेवण, दुपारचा चहा, रात्रीचा मुक्काम अनेक गजानन भक्त व दात्यांनी व्यवस्था केलेली आहे.
महिला वारीसाठी अनमोल सहकार्य माऊली गजानन ग्रुप रडावण राजोरे, तर ज्ञानेश्वर कोळी यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे. विलास पाटील, संजय पाटील मुन्ना पाटील, सबगव्हाण, भैय्या साळुंखे जळोद, आनंद पाटील, वैद्यकीय सेवा डॉक्टर प्रशांत शिंदे साई सेवा हॉस्पिटल अमळनेर, रथ व पालखीची सजावट चेतन उपासनी,अमळनेर मेडिकल सेवा भूषण पाटील, टेकचंद परदेशी, जिजाबराव पाटील खडकी सिम अमळनेर, अनमोल सहकार्य मातोश्री टेन्ट हाऊस अमळनेर, विशेष परिश्रम मोहित पवार व सर्व गजानन परिवारातील सदस्य बंधू भगिनी मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहे असे गजानन सेवा संस्थांनचे अध्यक्ष आप्पासाहेब प्रा. राजेंद्र पवार यांनी सांगितले..

