1 min read

आगामी वर्ष निवडणुकीचे म्हणून पोलीस पाटलांनी सतर्क रहावे-डीवायएसपी सचिन हिरे

Loading

आगामी वर्ष निवडणुकीचे म्हणून पोलीस पाटलांनी सतर्क रहावे, डीवायएसपी सचिन हिरे,,,,,,
येणारे वर्षे हे निवडणुकीचे असून पोलीस पाटलांनी येणाऱ्या वर्षात लोकसभा विधानसभा तसेच ग्रामपंचायत च्या निवडणुका आहेत गावात निस्वार्थपणे कामगिरी बजावून गावातील कायदा सुव्यवस्था बाबत जागृत राहून गावात बारीक सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून गावात जातीय तेढ निर्माण होणार नाही याबाबत सतर्कता बाळगुन दक्ष राहावे तसेच गुरं चोरी चोरांचे प्रमाण बालविवाह यावर संशय आल्यास लगेच सतर्कता बाळा व आपले गाव शांतता प्रिय ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान शिरपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक सचिन हिरे यांनी पोलीस पाटलांच्या नरडाणा येथे बैठकीला मार्गदर्शन करताना केले
यावेळी तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटलांचा डीवायएसपी सचिन हिरे नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन बेंद्रे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व नवयुक्त पोलीस पाटलांनी गावातील कायदा सुव्यवस्था बाबत वेळोवेळी सूचना गृह तसेच महसूल विभागाला वेळोवेळी द्याव्यात यावेळी पोलीस पाटील संजय खैरणार यांनी पोलीस पाटलांच्या समस्या व अडचणी मांडल्या पोलीस पाटलांचे अत्यल्प मानधन असले तरी 24 तास सतर्क राहून पोलीस व महसूल प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करून पोलीस पाटलाची जबाबदारी सांभाळतात संघटनेचे कार्याध्यक्ष महेंद्र पाटील तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील शिवाजी पाटील माजी तालुकाध्यक्ष विटाई राजेंद्र पाटील मेलाणे पोलीस पाटील विभागीय अध्यक्षभूषण बोरसे दीपक माळी भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी अभिजीत कापसे उपाध्यक्ष नारायण गिरासे विजय पाटील हेमंत सूर्यवंशी चरणसिंग गिरासे सुरेश पाटील भाऊ परदेशी भागवत गिरासे फारख पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण गिरासे यांनी केले तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *