अध्यापन पद्धतीत विविध तंत्रज्ञानाचा वापर करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
![]()
अध्यापन पद्धतीत विविध तंत्रज्ञानाचा वापर करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
अमळनेर तालुकास्तरीय प्रशिक्षण दुसरा टप्पा प्रताप हायस्कूल अमळनेर येथे सुरू.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
प्रशिक्षणामध्ये मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग, मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढविणे. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. मुलांना शिकण्यास आव्हाने देणे, भविष्यातील शिक्षण या विषयावर प्रशिक्षण घेतले जाणार आहे असे तालुकास्तरावरील प्रशिक्षणात गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले…
सदर प्रशिक्षणासाठी श्री. चंद्रकांत साळुंखे,शरद सोनवणे सुनील काटे भगवान पाटील, देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील, चंद्रकांत देसले, प्रेमराज पवार, रत्नपारखी सर हे प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत. तसेच प्रशिक्षणा करिता बैठकीवस्था साहित्य वाटप इतर कामकाज गटसाधन केंद्रातील विशेष शिक्षक अमोल पाटील किशोर पाटील हंसराज पाटील महेंद्र पाटील शितल भदाणे रेखा वारडे सुनीता पाटील सोनाली पिंगळे हे करत आहेत.प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी श्री. रावसाहेब मांगो पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कविता भीमराव सुर्वे यांनी केले.प्रशिक्षण वर्गांच्या वतीने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे ता.अध्यक्ष बापूराव पाटील( ठाकरे) यांनी आभार मानले.



