1 min read

अमळनेर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेयस्तरीय क्रीडा व बौद्धिक स्पर्धा संपन्न

Loading

अमळनेर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेयस्तरीय क्रीडा व बौद्धिक स्पर्धा संपन्न

अमळनेर- खान्देश गौरव (कै) रुख्मिणीताई स्मृती चषक क्रीडा- बौद्धिक स्पर्धा अंतर्गत येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेयस्तरीय विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या. प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा डॉ एस ओ माळी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य गायत्री भदाणे अध्यक्षस्थानी होत्या. मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय रुक्मिणीताई नवल पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील पाटील, सुनील साळुंखे, सुरेश पाटील, आर आर पाटील, नितीन पाटील, कल्याण पाटील, किरण पाटील, कल्पना महंत, लता पवार, जी.पी हडपे, दीपक पाटील, नीलिमा पाटील, एन बी खंडारे, व्ही सी पाटील आदी उपस्थित होते. स्वर्गीय भागीरथीबाई ओंकार माळी यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रा डॉ एस ओ माळी आणि प्रतापियन्स परिवारातर्फे बक्षिस स्वरूपात शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा डॉ एस ओ माळी व गायत्री भदाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. जी पी हडपे यांनी आभार मानले. दिलीप मनुरे, सतीश बाविस्कर, प्रवीण उशीर, सुरेश पाटील आदींनी सहकार्य केले.

शालेयस्तरीय स्पर्धेतील विजेते असे…..

निबंध स्पर्धा (पाचवी ते सातवी गट) प्रथम- देवयानी किशोर पाटील, द्वितीय -रोशनी छबिलाल पाटील (आठवी ते दहावी गट) प्रथम- नंदिनी राहुल राजपूत, द्वितीय भाविका प्रवीण पाटील,(ज्युनियर विभाग)प्रथम अंजली निंबा पाटील, द्वितीय- धनश्री लक्ष्मण सावकारे
वकृत्व स्पर्धा (पाचवी ते आठवी गट) प्रथम- प्रतीक्षा जयवीर पाटील द्वितीय- श्रेया शरद पाटील.(नववी ते दहावी गट) प्रथम- प्राची दत्तात्रेय पाटील, द्वितीय-कनिष्का देवानंद पाटील,(ज्युनियर विभाग) प्रथम -अंजली निंबा पाटील, द्वितीय- रितू संजय पाटील
धावणे 100 मीटर (पाचवी ते सातवी गट) प्रथम- हेमलता किशोर पवार (सहावी), द्वितीय- शिवानी मनोहर सोनवणे, (आठवी ते दहावी गट) प्रथम- स्वाती दिनेश पाटील, द्वितीय- प्राची दत्तात्रेय पाटील, (ज्युनियर विभाग) प्रथम- भाग्यश्री गणेश पाटील, द्वितीय- पायल किशोर चव्हाण

खो-खो (पाचवी ते सातवी गट) विजेता -राणी लक्ष्मीबाई ग्रुप (आठवी ते दहावी गट) विजेता- जिजाऊ माता ग्रुप, (ज्युनियर विभाग) विजेता- सावित्रीबाई फुले ग्रुप

अमळनेर- बौद्धिक व क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनी समवेत प्रा डॉ एस ओ माळी प्राचार्य गायत्री भदाणे व शिक्षक वृंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *