1 min read

विद्रोही साहित्य संमेलन यशस्वीते करिता एरंडोल तालुकास्तरीय नियोजन सभा बुधवारी

Loading

✒️विद्रोही साहित्य संमेलन यशस्वीते करिता एरंडोल तालुकास्तरीय नियोजन सभा बुधवारी

दि. 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी अंमळनेर येथे अठरावे विद्रोही साहित्य संमेलन होत असून सदर साहित्य संमेलनाच्या नियोजना संदर्भात प्रत्येक तालुक्यांमध्ये नियोजन सभा संपन्न होत आहेत.
प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करुन देशांमध्ये सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी या साहित्य संमेलनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली आहे.
साहित्य संमेलनाच्या नियोजनाचा एक भाग म्हणून एरंडोल तालुक्याची नियोजन सभा 20 डिसेंबर,2023 रोजी बुधवारी संध्याकाळी 6 वाजता सभागृह हॉटेल कृष्णा, एरंडोल याठिकाणी संपन्न होत आहे. सदर एरंडोल तालुका नियोजन सभेकरिता साहित्य संमेलन नियोजन समितीचे पदाधिकारी मा.प्रा.अशोक पवार, मा.श्याम पाटील( नगरसेवक), प्रा.डॉ. लिलाधर पाटील, मा.अशोक बिऱ्हाडे साहेब, मा.गौतमदादा मोरे, मा. दयाराम पाटील, मा.रणजित शिंदे, मा.सोपान भवरे, मा.अजय भामरे, मा.बापूराव ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
सदर साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यासाठी आयोजित या संवाद सभेला एरंडोल तालुक्यातील चळवळीचे कार्यकर्ते साहित्यिक व समतावादी विचारवंतांनी उपस्थित राहून साहित्य संमेलन यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन एरंडोल तालुकास्तरीय सभेचे निमंत्रक समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *