1 min read

साहित्य संमेलनाच्या कार्यात स्वतःला झोकून द्या-
प्रकाश पाठक धुळे

Loading

साहित्य संमेलनाच्या कार्यात स्वतःला झोकून द्या-
प्रकाश पाठक धुळे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर मध्ये होत आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य संमेलनाच्या कार्यामध्ये प्रत्येकाने स्वखुशीने काम करून अ.भा.मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये आपला हातभार लावावा.. तन मन धनाने सर्वांनी साहित्य संमेलन यशस्वी करावे करावे असे आवाहन अमळनेर येथे जीएस हायस्कूलमध्ये सुविचार सभेत धुळे येथील प्रकाश पाठक यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची जी.एस हायस्कूल येथे दुपारी दोन वाजता सुविचार सभा संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खाशी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे होते. डॉक्टर अनिल शिंदे व निरज अग्रवाल यांनी साहित्य संमेलनाला मार्गदर्शन केले. साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवावे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतः आपली जबाबदारी सांभाळावी..साने गुरुजींच्या कर्मभूमीचा नावलौकिक करावा असे साहित्य संमेलन आयुष्यात एकदाच येते असे त्यांनी सांगितले.
यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक मराठी वांग्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी यांनी केले. प्रमुख अतिथी जी.एस हायस्कूलचे चेअरमन हरी भिका वाणी, प्रा प्रकाश पाठक धुळे उपस्थित होते.
सूत्रसंचालन दिनेश नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन जीएस हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी मानले यावेळी वा:डमय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रम्हे ,नरेंद्र निकुंभ ,शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्राध्यापक डॉक्टर पी बी भराटे, बन्सीलाल भागवत, श्रीमती स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे,सौ वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर , प्रा डॉक्टर सुरेश माहेश्वरी ,प्रा श्याम पवार,प्रा सौ शीला पाटील, अजय केले ,बजरंग अग्रवाल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *