ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या तात्काळ सोडवा,सरपंच व ग्रामसेवक संघटनेची सरकारकडे मागणी
![]()

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या तात्काळ सोडवा,सरपंच व ग्रामसेवक संघटनेची सरकारकडे मागणी
पारोळा (वार्ताहर) – अखिल भारतीय सरपंच परिषद आणि ग्रामसेवक यूनियन डि एन ई 136 यांच्याकडून ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारकडे धाव घेण्यात आलेली आहे, ग्रामीण भागात पूर्ण मेहनत करून जॉबकार्ड धारक मजूर लाभार्थी यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व उत्पन्न वाढ व्हावी यासाठी खुप मेहनत घेत असतो मनरेगाचा मुख्य घटक ग्रामरोजगार सेवक आहे त्यांच्या मागील 15 वर्षाच्या प्रलंबित मागण्या मंजुर होण्यासाठी सरपंच संघटना व ग्रामसेवक युनियन यांच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेसोबत दि. १८/११/२०२३ रोजी ग्रामपंचायतीत काम करणारे सर्व घटक संघटनांची बैठक घेण्यात आली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करणाऱ्या सर्व कर्मचारी संघटना यामध्ये ग्रामसेवक युनियन, सर्व ग्रामरोजगार सेवक संघटना, सर्व संगणक परिचालक संघटना, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्रित रित्या विविध प्रलंबित न्याय मागण्यासाठी सरकारचे लक्षवेध करण्यासाठी दिनांक १८/१२/२०२३ ले २०/१२/२०२३ या तीन दिवसाचे ऐतिहासिक राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायत मनरेगा अंतर्गत ग्रामरोजगार सेवक विकासाचा महत्वाचा भाग असुन सुध्दा ग्रामपातळीवर काम करणाऱ्या यामरोजगार सेवकांच्या कर्मचारी याच्या न्याय मागण्या सातल्याने प्रलंबित ठेवल्या जात आहेत त्यामुळे ग्रामरोजगार सेवक संवर्गाच्या न्याय मागण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन डि एन ई 136 सह महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना संपामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यानुसार ग्रामरोजगार सेवकांच्या पुढीलप्रमाणे प्रलंबित मागण्या आहेत ग्रामरोजगार सेवकांना दरमहा फिक्स मानधन देण्यात यावे ग्रामरोजगार सेवकांना वैयक्तिक खात्यावर मानधन देण्यात ग्रामरोजगार सेवकांना TADA देण्याबाबत दि. 26 फेब्रुवारी 2013 चे परिपत्रकाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी ग्रामरोजगार सेवकांना विमा संरक्षण लागू करण्यात यावे आणि कोरोना काळात मरण पावलेल्या ग्रामरोजगार सेवकांना विम्याचा लाभ देण्यात यावा या मागण्याबाबत किशोर शिंदे गटविकास अधिकारी पंचायत समिती पारोळा यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष शितल पाटील ग्रामसेवक यूनियनचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील ग्रामविस्तार अधिकारी सुनिल आप्पा ग्रामरोजगार सेवक संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे तालुकाध्यक्ष शरद पाटील संजय पाटील चंद्रकांत माळी ज्ञानेश्वर पाटील सुशिल पाटील किशोर पाटील मोतीलाल पाटील आदि बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते

