अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भात मराठी वाड:मय मंडळाच्या पदाधिकारी यांची उद्या बैठक..
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उद्या बैठक..
खान्देश शिक्षण मंडळाच्या संस्थेतील
मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी- 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होत असल्यामुळे उद्या दिनांक 19 डिसेंबर वार मंगळवारी जी.एस हायस्कूल आय एम ए हॉलमध्ये खानदेश शिक्षण मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची दुपारी 2 वाजता सविचार सभा आयोजित केली आहे तरी या सहविचार सभेला सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे मराठी मराठी वांग्मय मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी आवाहन केले आहे..
या विचार सभेला सुप्रसिद्ध वक्ते धुळे येथील प्रा. प्रकाश पाठक मार्गदर्शन करणार आहेत तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठी वा:डमय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रम्हे ,नरेंद्र निकुंभ ,शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्राध्यापक डॉक्टर पी बी भराटे, बन्सीलाल भागवत, श्रीमती स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे,सौ वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर , प्रा डॉक्टर सुरेश माहेश्वरी ,प्रा श्याम पवार,प्रा सौ शीला पाटील, अजय केले ,बजरंग अग्रवाल यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे

