‘ध’ चा ‘म’ करु नका, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या सगळ्यांनाच जुनी पेंशन लागू – आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
![]()
‘ध’ चा ‘म’ करु नका, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या सगळ्यांनाच जुनी पेंशन लागू – आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
अमरावती प्रतिनिधी
लढाई अजून संपली नाही – विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना अनुदान व पेंशन, आश्रमशाळा वेळ, काम नाही वेतन नाही जीआर, संचमान्यता त्रुटी, थकीत हप्ते, शेवटच्या वर्गाची संख्या 30 पेक्षा कमी असणाऱ्या शाळांचा प्रश्न, त्रुटी पूर्तता न केल्यामुळे अनुदानास अपात्र ठरणाऱ्या शाळा, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील पात्र/ अपात्र शाळांचा वाढीव टप्पा, आश्वासीत प्रगती योजना, कला व क्रीडा शिक्षकांचा प्रश्न यावर काम करणार- सौ. संगीताताई शिंदे
जुनी पेंशन मिळवून देण्यासाठी अग्रणी भूमिका घेणारे आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांचे विदर्भातील शिक्षकांतर्फे जंगी स्वागत व आभार सोहळा संपन्न
सौ.संगीताताई शिंदे (बोंडे ) यांचे आयोजन
विभागातील तसेच राज्यातील शिक्षक बांधवच माझी ऊर्जा, जोश, प्रेरणास्त्रोत – सौ. संगीताताई शिंदे
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
अमरावती दि. 17 नोव्हेंबर 2023.
तुमची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची ना? मग विषय संपला. तुम्हाला जुनी पेंशन लागू झाली. मग ते राज्यामध्ये 26,000 कर्मचारी असो वा 36000 कर्मचारी असो सर्वांनाच जुनी पेंशन लागू झाली आहे. उगाच बाकीचे प्रश्न उपस्थित करून व ‘ध’ चा ‘म’ करून बुचकळ्यात पडू नका असे मत कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.
माझी लढाई संपली नाही. आता मला शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा आहे. विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना अनुदान, संचमान्यता त्रुटी, थकीत हप्ते, शेवटच्या वर्गाची संख्या 30 पेक्षा कमी असणाऱ्या शाळांचा प्रश्न, त्रुटी पूर्तता न केल्यामुळे अनुदानास अपात्र ठरणाऱ्या शाळा, अकोला जिल्ह्यातील पात्र/ अपात्र शाळांचा वाढीव टप्पा, आश्वासीत प्रगती योजना, कला व क्रीडा शिक्षकांचा प्रश्न या सर्वच विषयावर मी व ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांना सोबत घेऊन काम करणार असून आपल्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही व साहेबांही स्वस्थ बसू देणार नाही असे आश्वासन सौ. संगीताताई शिंदे यांनी उपस्थित शिक्षक बांधवांना दिले.
सत्काराला उत्तर देतांना ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब म्हणाले की, “हा माझा सत्कार नसून राज्यातील न्याय मिळालेल्या 26 – 36000 कर्मचारी बांधवांचा हा सत्कार आहे.त्यांच्या वतीने मी हा सत्कार स्वीकार करतोय परंतु आपल्या या सत्काराची व प्रेमाची परतफेड मी आपले प्रश्न सोडवून निश्चित करेल” असे अभिवचन त्यांनी दिले.
ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांना शिक्षकांविषयी प्रचंड तळमळ, शिक्षणक्षेत्राचे ज्ञान आहे. साहेब पेशाने शिक्षकच असल्यामुळे सर्व समस्या ज्ञात आहेत. आमदार शिक्षक असल्यास त्यांना सांगण्याची काही गरज राहत नाही. म्हणून पुढच्या वेळेस आपण ही बाब लक्षात ठेवावी असे सूतोवाच संगीताताईंनी केले. जुन्या पेंशनची,संघर्षाची उपोषणाची, आंदोलनाची यशोगाथा सांगतांना, राज्यातील बांधवांचे मग ते मुस्लिम असो, ख्रिश्चन असो वा कुठल्याही धर्माचे असो त्यांचे सहकार्य, ऋण कधी फिटणार नाही हे सांगतांना त्या गहिवरल्या सुद्धा होत्या. शिक्षक बांधवांचा एखादा प्रश्न सुटला की मला अत्यानंद होतो तेच माझ्या परिश्रमाचे फळ आहे असेही त्या म्हणाल्या.
31 मे 2005 ला अधिसूचना निघाली होती. त्याच धर्तीवर 1 ऑक्टोबर 2005 च्या शासननिर्णयाने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी हा शब्द वापरल्या गेला. एकनाथजी शिंदे साहेब यांनी वित्त विभागाच्या अधिसूचनेचा संदर्भ घेतला एवढेच आहे. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी सविस्तर बोलणे झाले असून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कितीही असुद्या पेंशन लागू झाली असे अभिवचन त्यांनी दिले आहे.
यावेळी अमरावती विभागातील श्री.अशोक भराड, आशिक संघटनेचे अध्यक्ष श्री.गणेश सानप,अनंतकुमार आंबेकर -वणी, प्रा. संतोष वाघ, सुनील डहाके, भाजपा शिक्षक आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष पदमाकर घोगरे,अजीज राहत,धनंजय खेडकर, निळकंठ म्हैसने, विजय भड, दिगंबर भूगुल, संतोष वाघ,परिमल नळकांडे,सुशील इखनकर, कृपा पटेल, श्री. नितीनभाऊ गुडधे, शरदभाऊ तिरमारे, विकास दिवे, रितेश खुळसाम, अभिजीत धानोरकर, दिनेश धोटे, प्रफुल राव,सागर शहा, मिलिंद नक्षीने, अमोल भोजने, तुषारकांत बेलसरे, विनय पुनसे, अरुण ठाकरे, चित्रा जोशी, मीना गावफळे, किशोर पाटील, नंदश्याम कुकडकर, नरेंद्र इंगळकर, सचिन अंजिकर,प्रवीण जायदे, प्रवीण पाटील, उमेश महल्ले,सैय्यद जावेद, मिर्झा जहागीर बेग,मिर्झा इरफान बेग, अहेसान खान, जावेद बेग, मो. अब्दुल वाजेद, विलास लोलगे, समाधान वर, शेख चांद शेख, राजेश गोडसे, बी. निंभोरकर, किरण राठोड, गजानन गांजरे, मिलिंद वानखडे, सुभाष वानखडे, पुरुषोत्तम वाटाणे, अनंता उंबरकर, सुधीर पांडव, सुभाष अर्मळ, शेख वसीम, प्रकाश केचे, अविनाश पारखी, गजानन डेरे, अजय ढबाले, मनोहर वेढाळे, पंकज देशमुख, रोहिदास येवले, एस के कुबेटकर, मो. सलीम, समिउल्लाह खान, प्रवीण निलखन, ज्ञानेश्वर नवलकर, एन एच शेख, एच एस पठाण, एन ए अली, जि वाय अन्सारी, एस टी बेग, डब्ल्यू एफ शेख, आर व्ही रेवस्कर, संदीप उगलमुगले, शाहिस्ता पटेल, शोभा वानखडे, माधुरी थोटांगे, रेहान अहेमद, व्यंकटेश द्यावर्तीकर, महेश पामे, शेख नजीर, पाऊल, विनोद गोडबोले, संतोष तनपुरे, राजेश खंडारे, किरण राठोड, बंडू निंभोरकर, अनंता गावंडे, रामेश्वर निचळ, सुधीर पांडव, प्रकाश केचे, शेख हबीब, सुभाष अर्मळ, अशोक मोहोड, आर पी वैद्य, विनोद खिरटकर, रविंद्र करमरकर, देवेंद्र घुले, राकेश ठाकरे, प्रविण कदम, सय्यद अमीन, सौ. प्रभाती ठवकर, दिपक सोनोने, उषा गवई, बंडू नळकांडे, एस आर वानखडे, जी बी वानखडे, राजेंद्र टापरे, प्रमोद जामनिक, संजय ठाकरे, सौ. रत्नमालाताई, प्रवीण निलखन, ज्ञानेश्वर नवलकर, अजय देशमुख, रामराम देशमुख, सतिश देशमुख, बाबाराव अंभोरे, श्याम कुबेटकर, गजानन भोपळे, राजेंद्र बुटे, गजानन टाले, दिनकर धामणकर, विष्णुदेव इंगळे, प्रदीप काळपांडे, चंद्रकांत बोळे, द्वारकानाथ चिलवंते, जगन्नाथ घोगले, मुरलीधर बिडकर,एस यु खान, एम यु खान, एम आर खान, एस जी शेख, जे ए शेख, जि डी मुंदे, डी एस सोळंके, एन एस धोटे, एस एम बेग, आसिफ खान, संतोष राउत, आर जे फरतोडे, आर एन तलवारे, अशोक राहाटे, प्रफुल देशमुख, एन आर नागापुरे, एस बी अर्मळ, एम एस बेलसरे, पी पी महल्ले, ए एम मनोहर, आर एच गणवीर, देविदास काळपांडे, अनिल हजारे, संतोष नेमाने, संदीप उगलमुगले, प्रमोद मुंढे, देव चव्हाण, एस नागमोते, एस डी भोंडणे, डी एस शृंगारे, डी डी शिंदे, आर व्ही रेवस्कर, काकड सर, शेडेकर सर, ओलीवकर सर, कवाने सर, आर डी कोकाटे, मधुसूदन ढोरे, संजय तायडे, एजाज खान, अजय देशमुख, रामराव देशमुख, सतीश देशमुख, श्याम कुबेटकर, बाबाराव अंभोरे, गजानन भोपळे, चक्रधर मोहोड, धिरज शर्मा, राजू लबडे, पुरुषोत्तम कोरडे, ज्ञानेश्वर कोरडे, गेडाम, श्री.कोंडे, निलेश साबळे, कीर्ती ढोकणे, सोनोने, उमाळे, कवाने, लबडे, रवींद्र वैराळे, अनिल नांदेकर, गणेश चोखंडे, कैलास वाघमारे, महादेव सोनोने, मिलिंद दानडे, निलेश काळे, विजय पारे, बाबुराव सहारे, भाष्कर ढेवले, बाबू पप्पूवाले, ए एस घुलक्षे, श्रीकांत देशमुख यासह अमरावती विभागातील बहुसंख्य शिक्षक बांधव व भगिनी उपस्थित होत्या.









