दिल्ली येथे राष्ट्रीय पँरा पाँवर लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे यांने 107 किलो गटात कास्यपदक पटकावल्याबद्दल झाला सत्कार…
![]()




दिल्ली येथे राष्ट्रीय पँरा पाँवर लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे यांने 107 किलो गटात कास्यपदक पटकावल्याबद्दल झाला सत्कार…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
साने गुरूजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने दिल्ली येथे संपन्न झालेल्या नॅशनल पॅरा पॉवर लिफ्टिंग ( खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023) 107 वजनी किलो गटांत मिळविले कास्य पदक अथक परिश्रम , जिद्द , चिकाटी , मसल्स फॅक्टरी जीमचे संचालक श्री किशोर महाजन यांचे मार्गदर्शन , आई -वडिल गुरुजनांचे आशिर्वाद , आपल्या सरावातील नियमीत सातत्य याच्या बळावर दिनेशने हे उज्वल यश प्राप्त करतांना पहिल्या प्रयत्नात 135 Kg , दुसऱ्या प्रयत्नात 141 kg व तिसऱ्या प्रयत्नात 148 Kg वजन उचलून कास्य पदकाचा मानकरी ठरत केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर आपल्या अमळनेर नगरीचे नाव उज्वल केले. विशेष म्हणजे दिनेशने दुर्दैवाने रेल्वे अपघातात आपला एक पाय गमावला असून त्यावर यशस्वी मात करीत त्याने हे घवघवीत यश प्राप्त केलेले आहे .
नुकताच अमळनेरला सत्कार प्रसंगी ना.अनिल पाटील, प्रा.अशोक पवार,एस.डी.देशमुख, सुनील पाटील, श्रीमती अनिता बोरसे,
विक्रांत पाटील,डि.ए.धनगर,महेंद्र महाजन, योगेश महाजन, सुरेश पाटील,दर्शना पवार, प्रा डॉ लिलाधर पाटील,
ईश्वर महाजन,संजय पाटील,आर.जे.पाटील,
किशोर महाजन मसल फॕक्टरी जिमचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे , भटु विसपुते , मुकेश पाटील , अभिषेक पाटील , अजित्य सैंदाणे , गिरीष पाटील , देवेंद्र विसपुते यांनी शाल,बुके,पुस्तक देऊन सत्कार केला.

