1 min read

शालेय जीवनातला संस्कार आयुष्याला घडवतो-जितेंद्र नेहेते

Loading

शालेय जीवनातला संस्कार आयुष्याला घडवतो.-जितेंद्र नेहेते

शाळा हे संस्काराचे विद्यापीठ असून शालेय जीवनातला संस्कार आयुष्याला घडवत असतो आणि हा संस्कार आपल्या जीवनाची वाटचाल समृद्ध करत असल्याचे मत उपकोषागार अधिकारी जितेंद्र नेहेते यांनी सार्वजनिक विद्यालयात आयोजित सत्काराप्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाराम भुगवदया हे होते.
याप्रसंगी ते पुढे म्हणाले उज्वल भविष्याचे फक्त स्वप्न पाहू नका तर ध्येय ठरवा यातून स्वप्नांची परिपूर्ती होण्यासाठी शालेय जीवनात आपल्याला अभ्यासाचे महत्त्व कळणे अत्यंत आवश्यक असल्याचे देखील त्यांनी मांडले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी जितेंद्र नेहेते यांची कोषागार कार्यालयात उपकोषागार अधिकारी या पदी पदोन्नती झाल्याबद्दल मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शुभांगी कोळी, वैष्णवी मिस्तरी, निकिता सोनवणे, निशा पाटील, चिन्मय भोळे या विद्यार्थ्यांनी तसेच वर्गशिक्षक सचिन जंगले यांनी वाचन प्रकल्प अंतर्गत मी वाचलेले पुस्तक याबद्दल माहिती सांगितली. मराठी समितीतर्फे विविध स्पर्धांमध्ये बक्षीस पात्र विद्यार्थी, विद्यार्थिनी तृप्ती बिऱ्हाडे, चैताली वानखेडे, जान्हवी जाधव, प्रज्ञा कापडणे, शाश्वती माळी, हर्षाली पाटील,
यज्ञिका पाटील,योजना कोल्हे, योजना वाणी ,ओम कोळी, विनय कोल्हे, मोक्षा पाटील, आदिती कोल्हे यांना बक्षीस देण्यात आले तर अध्यक्ष जी. के. भुगवड्या यांनी कठोर मेहनतीला महत्व दिले पाहिजे असे सुचवले डॉ. मिलिंद बागुल, लालसिंग पाटील, दिगंबर महाजन, मंगला नारखेडे, गोपाळ महाजन, प्रशांत कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मीनाक्षी कोल्हे यांनी तर सूत्रसंचलन शुभांगीनी महाजन,आभार वृषाली चौधरी यांनी मानले तसेच विविध स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन जितेंद्र नेहते यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *