1 min read

विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी घेतला खेळाचा आनंद.आई बाबा आम्हाला वेळ द्या.विद्यार्थ्यांचा पालकांना संदेश

Loading

विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी घेतला खेळाचा आनंद.आई बाबा आम्हाला वेळ द्या.विद्यार्थ्यांचा पालकांना संदेश

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) – पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक प्राथ.व माध्य. विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला.डॉ. शोभा पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करत पाच दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या .व त्या मुख्य आकर्षित ठरल्या.दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या पालकांनी एक दिवस वेळ काढत खेळातून आपल्या मुलांबरोबर आनंद घेतला.विद्यार्थी आणि पालकांमधील मोबाईल टी. व्ही. मुळे होत असलेला दुरावा खेळ या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला. असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. आपली आई खेळते पाहून मुलांनी मम्मी,मम्मी आवाज देत पालकांचा उत्साह वाढवला.तसेच आई बाबा आम्हाला वेळ द्या. असा संदेश लिहिलेली पत्रक विद्यार्थ्यांनी हातात घेत पालकांना भावनिकही केले.संगीत खुर्ची खेळात वेगवेगळ्या गटात संगीता जाधव ,ऋतुजा नमसळे, रसिका कांबळे, वर्षा वांगनेकर, व अनिकेत मोहिते पालक प्रथम आले. गोटी चमचा खेळात सीमा खुताडे, माला चव्हाण, अर्चना भारुडे, वर्षा वांगणेकर हे पालक वेगवेगळ्या गटात प्रथम आले.स्लो सायकलिंग खेळात अनिकेत मोहिते व सोनाली बोरगावकर प्रथम आले.सर्व यशस्वी पालकांचे शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.सूत्रसंचालन करणारे शिक्षक गणेश पाटील यांनी आपल्या शब्दसुमनांनी पालकांचे मनोरंजन केले.आपल्या कल्पकतेचा वापर करत पालकांच्या स्पर्धा यशस्वी करणारे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी पालकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *