1 min read

नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगाने शारदा माध्यमिक विदयालय द्वितीय!!

Loading

नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगाने शारदा माध्यमिक विदयालय द्वितीय!!

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यात विज्ञान प्रदर्शन हे दरवर्षी होते. विज्ञान हा मानवाच्या प्रगतीचा आत्मा होय. अमळनेर तालुक्यात कालच विज्ञान प्रदर्शन झाले. अमळनेर तालुक्यात शारदा माध्यमिक विदयालय ही उपक्रमशील शाळा आहे. ह्या शाळेत तालुक्यातील विज्ञान प्रदर्शना अगोदर शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान प्रदर्शन पार पडले होते. यात एकुण 46 माॅडेल होते. त्यात 92 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञानातून शहराचा विकास हे माॅडेल प्रथम आले. त्यात प्रगत सेंसरदवारे सनियंत्रण करणारी सुलभ वैज्ञानिक पद्धती यावर प्रयोग होता. जपान हा देश ह्याच तंत्रज्ञानाने जगात पुढे आहे. त्यांची मेट्रो रेल्वेची संकल्पना जगाने स्विकारली आहे. हाच प्रयोग त्यांनी तालुक्यावर नेला. त्यात कळमसरे शाळेचा द्वितीय क्रमांक आला. हा प्रयोग मोठ्या गटासाठी तयार केलेला होता. प्रयोगात भाग घेतलेले विद्यार्थी होते. पियुष ज्ञानेश्वर महाजन व राकेश शांताराम पवार,
कृष्णा महाजन, नितीन मचगे, भावेश गुरव ह्या मुलांनी अथक मेहनत घेऊन खेडयात काही सुविधा उपलब्ध नसतांना कमी खर्चात हा प्रयोग करुन दाखविला. त्यात त्यांना आर.सी. बडगुजर, एन. डी. पाटील, मुकेश सोनकुसरे सरांनी मेहनत घेतली. ह्या शिक्षकासह विद्यार्थ्यांचे पंचायत समिती अमळनेर चे गटशिक्षण अधिकारी रावसाहेब मांगो पाटील व मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करून बक्षिस दिले.तसेच
मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *