अमळनेरला सावित्रीबाई फुले विद्यालयाचे गाईड शिबिर, संरक्षण प्रशिक्षण संपन्न
![]()



अमळनेरला सावित्रीबाई फुले विद्यालयाचे गाईड शिबिर, संरक्षण प्रशिक्षण संपन्न
अमळनेर प्रतिनिधी- निवासी गाईड शिबिरातून विद्यार्थिनींना संरक्षण प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. यातून विद्यार्थिनींना स्वावलंबनाचे धडे मिळतात. यातून मनात विचारांचे रोपण होऊन विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्व विकासीत होत असते. सुसंस्काराचे दिवे प्रजल्वित होऊन त्यांचे भविष्य उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही असे मत पोलीस निरीक्षक विजय शिंदे पाटील यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे येथील पर्ल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झालेल्या तीन दिवसीय निवासी गाईड शिबिर व संरक्षण प्रशिक्षणच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड अध्यक्षस्थानी होते. वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रा चंद्रकांत भदाणे, प्रशासकीय अधिकारी प्रा. श्याम पवार, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी प्रा. के वाय देवरे, गाईडच्या जिल्हा कमिशनर तथा प्राचार्या गायत्री भदाणे, गाईडच्या तालुका कमिशनर कल्पना महंत गाईड शिक्षिका लता पवार, आयटीआयचे प्राचार्य संजय मोरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नीलिमा पाटील यांनी प्रास्ताविक केले उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. शिबिर स्थळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, पिंपळे हायस्कूलचे मुख्याध्यापक देसले सर, गोपाल पाटील, सुनील पाटील, सुरेश पाटील, नितीन पाटील, किरण पाटील, नितीन खंडारे, पृथ्वीराज पाटील, किरण शिरसाट, निकिता काटे प्रज्ञा हडपे, देवयानी पाटील, संध्या सोनवणे, उज्वला पाटील, अंकिता गोसावी, संदीप सोनवणे, पप्पू पाटील यांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान शेकोटीच्या कार्यक्रमाला गुरुदेव आर्केस्ट्रा चे संचालक सतीश कांगणे यांनी विविध गीते सादर करून विद्यार्थिनींचे मनोरंजन केले. यावेळी एस ए बाविस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आर्मी स्कूलचे कमांडंट तथा सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार बी पी पाटील, विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे यांनी विद्यार्थिनींनी उभारलेल्या तंबूंचे निरीक्षण करून काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. त्यांनी ‘उत्कृष्ट तंबू सजावट’ तयार करणाऱ्या संघाची निवड केली. त्यानंतर सहभागी प्रशिक्षणार्थीना ‘रायफल शूटिंग’ चे प्रशिक्षण दिले. तसेच मुलींनीही आपल्या कार्यकर्तृत्वावर संरक्षण दलात अधिकारी म्हणून काम करण्याचे आवाहन केले. या शिबिरात गाईड विद्यार्थिनींचे सात संघ तर संरक्षण प्रशिक्षण एक असे आठ संघ सहभागी झाले होते. सुमारे 60 विद्यार्थिनींना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. दररोज ध्वजारोहण करून गाईडची प्रार्थना व प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थिनींनी स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करून शिबिर परिसराची स्वच्छता व तंबू सजावट केली. आयटीआयचे प्राचार्य प्रकाश पाटील व सतीश कांगणे यांनी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊन ‘उत्कृष्ट भोजन’ तयार करणाऱ्या संघाची निवड केली. प्राचार्य गायत्री भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना महंत, व्हि सी पाटील, लता पवार, गोपाल हडपे, उमेश काटे उपस्थित होते. यावेळी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सखाराम पावरा, दिलीप मनुरे, सतीश बाविस्कर, प्रवीण उशीर, सुरेश पाटील यांच्यासह आयटीआय व पर्ल इंग्लिश मीडियम स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.नीलिमा पाटील यांनी सूत्रसंचालन तर गोपाल हडप यांनी आभार मानले.
अमळनेर – गाईड शिबिरात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक विजय शिंदे, शेजारी प्रा चंद्रकांत भदाणे, प्रा सुनील गरुड, प्रा शाम पवार, प्रा के वाय देवरे, गायत्री भदाणे आदी

