अमळनेर नगर परिषदेने पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय व टाँऊन हाँल येथील परिसर सुशोभीकरण व अद्ययावत करा
![]()

अमळनेर नगर परिषदेने पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय व टाँऊन हाँल येथील परिसर सुशोभीकरण व अद्ययावत करा
सानेगुरुजी वाचनालय व स्मारक समितीच्या वतीने नपाच्या मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने अमळनेर शहरातील रस्ते यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. तसेचे अमळनेर येथील सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे सुशोभीकरण व आजूबाजूचे रस्ते सुशोभीकरण व्हावे यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मुख्याधिकारी,अमळनेर नगरपरिषद यांना अमळनेरात होत असलेल्या साहित्य संमेलनानिमित्ताने शहर सुशोभिकरणाअंतर्गत आपल्या व परिसराच्या मुख्य प्रवेशव्दारापासून ते आपल्या संस्थांच्या प्रवेशव्दारापर्यंत काॅक्रीटीकरण व पेव्हर ब्लाॅक बसविणे हे काम नगरपालिकेच्या विशेष निधी करणेबाबतचे निवेदन ग्रंथालय व लोटिस्माचे वतीने श्री.जोशी सर,सानेगुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ,अमळनेर मसापचे संचालक श्री.संजय चौधरी, अर्बन बॅकेचे संचालक श्री.रणजित शिंदेसर यांचे उपस्थितीत निवेदन देण्यांत आले.

