1 min read

सरदारांचे विचार नव राष्ट्र निर्मितीसाठी पोषक-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे

Loading

सरदारांचे विचार नव राष्ट्र निर्मितीसाठी पोषक-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे

फुगेवाडी पिंपरी चिंचवड: महान राष्ट्रभक्त, कुशल राजनीतिज्ञ, कायदे पंडित व व राष्ट्रीय एकात्मतेचे शिरोमणी भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल यांचे विचार देशभक्तांना स्फूर्ती देणारे आहेत. राष्ट्र भक्तांसाठी स्फूर्तीचा जिवंत झरा म्हणजे सरदार पटेल ह्यांचे चरीत्र आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरदारांनी दिलेला मंत्र आत्मसात करून प्रत्यक्ष अमलात आणणे गरजेचे आहे. शेर का कलेजा रखो, सच बोलने की हिम्मत रखो, अन्याय केसात लढते रहो, घर की बात घर मे रखो हा जो मंत्र सरदारांनी दिला त्या मंत्राची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे असुन नवराष्ट्र निर्मितीसाठी ते विचार एक तत्त्वज्ञान आहे. सरदारांची विचार नव राष्ट्रनिर्मितीसाठी पोषक आहेत , असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक, ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. पद्मश्री डॉ.मणी भाई देसाई प्रतिष्ठान व सरदार वल्लभभाई पटेल लेवा पाटील समाज मंडळ यांच्या वतीने पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. रवींद्र भोळे यांनी वरील मत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक ,पत्रकार ,कवी श्री शिवाजीराव शिर्के संपादक पवणेचा प्रवाह हे होते. सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रम करण्यात आले. उरुळी कांचन येथेही त्यांच्या स्मृतीनिमित्ताने त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक सुनील महाजन, विजय वारके, दीपक फेगडे, चंद्रकांत चौधरी, डॉ.अपूर्वा भोळे, सौ संगीता रवींद्र भोळे संचलिका अस्मिता महिला नागरी सहकारी पतसंस्था उरुळी कांचन, व समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *