1 min read

१नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

Loading

१नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

अनिल बोरनारे यांच्या प्रदीर्घ लढ्याला यश

मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) राज्यातील सर्व विना अनुदानित, अंशतः अनुदानित पदांवर व तुकड्यावर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेंशनचा सुटला असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तर शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत आज केली.
याला वित्त विभागाने सहमती दर्शवली आहे. याबाबतचा अधिकृत शासननिर्णय लवकरच निर्गमित होणार असून राज्यातील २६ हजार कर्मचारी बांधवांना याचा लाभ होणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले
शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठीच्या राज्यातील शेकडो आंदोलनात अनिल बोरनारे सहभागी झाले होते. अनेक पदयात्रेत सहभागी होऊन या प्रश्नांवर आवाज उठविला होता.

१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्वांना जुनी पेन्शन द्यावी

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्वांना जुनी पेन्शन देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार व गाठीभेटी सुरू असून १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्वांना जुनी पेन्शन मिळणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *