सार्वजनिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन
![]()

सार्वजनिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन
असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.जे. बऱ्हाटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल व ज्येष्ठ शिक्षक डी. जी. महाजन उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कोमल नारखेडे, आदिती कोल्हे, मोहिनी पाटील,सानिया पिंजारी,हेमांगी पाटील व दक्ष कोल्हे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल व जी.आर महाजन यांनी प्रासंगिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.जी कोल्हे सूत्रसंचालन हेमलता सोळंके तर आभार के.बी तायडे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

