श्रीक्षेत्र पाडळसरेत गीता जयंती निमित्त नागपंचमीच्या दिवशी उदया हरिनाम कीर्तन सप्ताहास प्रारंभ
![]()
श्रीक्षेत्र पाडळसरेत गीता जयंती निमित्त नागपंचमीच्या दिवशी हरिनाम कीर्तन सप्ताहास प्रारंभ
त्रयोदशीला काल्याच्या कीर्तनाच्या महाप्रसाद वाटून होईल सांगता
पाडळसरे ( प्रतिनीधी )
तालुक्यातील श्रीक्षेत्र पाडळसरे गावी संत तुकाराम महाराज भजनी मंडळ आणि ग्रामस्थांकडून सालाबादा प्रमाणे या वर्षी ही गीता जयंती निमित्ताने मार्गशीर्ष नागपंचमीला म्हणजेच रविवारी दिनांक १७ डिसेंबर पासुन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ होईल तर मार्गशीर्ष त्रयोदशी दिनांक २४ डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटप होउन हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल. कीर्तन सप्ताहास परिसरातील या हरिनाम कीर्तन सप्ताहात भाविकांची मोठी उपस्थिती असते.
रविवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ नंतर मंत्रोच्चार व विधीवत पुजन अभिषेक करून विठ्ठल- रुक्मिणी मुर्ती स्थापित करून संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या प्रतिमासह श्रीराम सीता माता मूर्ती पूजन करून हरिनाम सप्ताहाची मांडनी होईल , यात दैनिक कार्यक्रम खालील प्रमाणे दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ ,भारुड व रात्री ८:३० ते १०:३० या वेळेत जाहिर हरीकीर्तनाचा कार्यक्रम होणार असून किर्तना साठी वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील नामवंत कीर्तनकार हजेरी लावून किर्तनरुपी सेवा देणार आहेत त्यात दिनांक १७ रोजी रविवारी हभप आकाश महाराज-पाडळसरेकर , दिनांक १८ सोमवारी हभप भोला महाराज -पाडळसरेकर जळगाव, दिनांक १९ मंगळवारी हभप लक्ष्मण महाराज- खेडीभोकरीकर, दिनांक २० बुधवारी हभप राम महाराज -भोनेकर नंदुरबार, दिनांक २१ गुरुवारी हभप देवगोपाल महाराज- आडगावकर,तर गीता जयंती निमित्त दिनांक २२ शुक्रवारी हभप भूषण महाराज-आंबापिंप्रीकर, दिनांक २३ शनिवारी दुपारी ४ ते ६ पालखी सोहळ्याची मिरवणूक होऊन विठ्ठल रुक्मिणी मुर्त्यांची व गीता भागवत ग्रथांची गावभर मिरवणूक काढण्यात येईल व रात्री हभप तेजस महाराज आदर्श वडगावकर यांचे कीर्तन होऊन रविवारी दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळास हभप तेजस महाराज यांचे काल्याचे जाहिर हरीकीर्तन होऊन १२ ते २ या वेळात महाप्रसाद वाटप होउन हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल. तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व महर्षी वाल्मिकी मित्र मंडळ , शिवसरदार ग्रुपसह एकलव्य मित्र मंडळ आणि पाडळसरे ग्रामस्थांनी केले आहे

