पाडळसरे धरणाच्या मंजुरीसाठी पाच( पंच)शक्तींच्या अथक प्रयत्नांना यश व विजय
भद्रा प्रतीक मॉल चे मालक प्रताप साळी यांनी मानले आभार
![]()

पाडळसरे धरणाच्या मंजुरीसाठी पाच( पंच)शक्तींच्या अथक प्रयत्नांना यश व विजय
भद्रा प्रतीक मॉल चे मालक प्रताप साळी यांनी मानले आभार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
1) आजी-माजी आमदार खासदार 2) धरण जन आंदोलन समिती 3) चौथा स्तंभ असलेले सर्व पत्रकार बंधू 4) महाराष्ट्र सरकार5) तसेच दादासाहेब अनिल पाटील विद्यमान आमदार व मंत्री महोदय या पाच शक्तीने आपल्या अथक प्रयत्नांनी धरणाच्या कामास प्रगतीपथावर आणून धरणाच्या कामास भरपूर निधी देऊन या सर्वांचे आभार व्यक्त केले.
तसेच तत्कालीन पाटबंधारे मंत्री श्रीमान नाथाभाऊ एकनाथ की खडसे व आबासाहेब डॉ बी एस पाटील दूरदर्शी आमदार यांनी या धरणाची मूहर्तमेढ रोवली.
धरण जन आंदोलन समितीच्या माध्यमातून सर्व स्थरातील लोकांनी उत्स्फूर्त साथ देऊन वेळोवेळी समिती पाठीशी उभे राहिले न भूतो न भविष्य जागतिक रेकॉर्ड करून शाळकरी विद्यार्थी पासून आभार वृद्ध सर्व जनता शेतकरी 55000 पत्र लिहिली प्रताप साळी श्री भद्रा प्रतीक यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आपल्या रक्ताने रक्तरंचित पत्र लिहिले या सर्वांची दखल घेऊन व विद्यमान आमदार अनिल दादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश येऊन आज धरणाचे काम मार्गी लागल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
भविष्यात केंद्रातून निधी आणण्यासाठी जन आंदोलन समिती ही सतत पाठपुरावा करीत राहील वेळप्रसंगी आंदोलन करेल व मंत्री महोदय व महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी जन आंदोलन समिती ठामपणे उभी राहू शकते सर्व पाच शक्तींचा आभार
भद्रा प्रतीक मॉलचे प्रताप साळी यांनी मानले…

