ज्ञानेश्वर माऊली ,शिक्षकांची साऊली आहेत, आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नला यश, पवित्र पोर्टल अगोदर नेमणूक झालेल्या कार्यरत विनाअनुदान शिक्षकांच्या मान्यता मिळणार.
![]()

, ज्ञानेश्वर माऊली ,शिक्षकांची साऊली आहेत, आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नला यश, पवित्र पोर्टल अगोदर नेमणूक झालेल्या कार्यरत विनाअनुदान शिक्षकांच्या मान्यता मिळणार.
मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील अनेक विनाअनुदानित शाळामध्ये पवित्र पोर्टल येण्या अगोदर शिक्षकांच्या नियुक्त्या संस्थानी केल्या आहेत, त्यांना मान्यता देण्या साठी शासनाने 10-6-2022 रोज शासन आदेश काढला आहे. त्यात शिक्षकांच्या नियुक्ती करताना शासनाकडून जाहिरातीस शिक्षण विभाग परवानगी घेतली असेल तरच वैयक्तिक मान्यता देता येईल, या अटींमध्ये अनेक शिक्षक वैयक्तिक मान्यते पासून वंचित होते, यातील अनेक शिक्षक 20 टक्के अनुदानासाठी पात्र आहेत, वैयक्तिक मान्यता नसल्याने त्यांच्यावर नोकरी गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सातत्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब तसेच अधिकारी वर्गांचे सातत्याने भेट घेतली होती, त्यावर तोडगा निघावा म्हणून या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज 14 डिसेंबर 2023 रोजी सदर एन ओसी ची अट रद्द करावी,म्हणून विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता, तसेच मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सदरचा प्रश्न उपस्थित केला होता.
या विषयाला यश मिळेले
असून अशा शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देताना जाहिरातीस परवानगी नसेल तरी चालेल तसेच मोठ्या पेपर मध्ये जाहिरात सूट दिली असून,जिल्हास्तरावरच्या वर्तमानपत्रातील जाहिरात सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल असे सकारात्मक उत्तर दिल्याने, विनाअनुदानित कार्यरत वैयक्तिक मान्यता नसलेल्या शिक्षकांच्या शिक्षकांच्या वैयक्तिक मार्ग मोकळा झाला असून, शिक्षकांसाठी नियमित तळमळीने काम करणारे, आणि सदरचा प्रश्न मिटवण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी पुढाकार घेतला, व शिक्षकांना मिळवून दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार
— विष्णू विशे संपर्कप्रमुख
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना

