1 min read

डॉ. रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड प्रदान

Loading

डॉ. रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड प्रदान

पुणे प्रतिनिधी
तीन दशकाहून अधिक काळ विविध क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेने, निरपेक्षपणे निरंतर निष्काम कर्मयोगी कार्य केल्याबद्दल उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक, ह भ प डॉ. रवींद्र भोळे महाराज यांना इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातव्या इंटरनॅशनल हुमनराईट्स डे दिनाचे औचित्य साधून गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे अध्यक्ष मनीष जी शर्मा यांनी वरील पुरस्कार डॉ.रवींद्र भोळे यांना प्रदान केला. डॉक्टर रवींद्र भोळे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते प्रवचनाद्वारे प्रबोधन व्यसनमुक्तीचे कार्यही करीत आहेत. अंध अपंग मूकबधिर मतिमंद संस्थांमध्ये ते कार्यरत असून अपंगांची दिव्यांगांची सेवा करीत आहेत. मराठवाडा भूकंप उरुळी कांचन गॅस्ट्रो साथ, पुरंदर तालुक्यात पूर्व भागामध्ये दुष्काळग्रस्त क्षेत्रात वैद्यकीय सेवा, पद्मश्री मनीबाई देसाई माणूस वॉटर प्रतिष्ठानच्या वतीने वीर क्षेत्रात त्यांनी कार्य केलेला आहे. आणि हृदय फिरताना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली आहे. राज्यभर अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे. डॉक्टर रवींद्र भोळे यांच्या कार्याबद्दल मॅगसेस शिवाय विजेते पद्मश्री डॉक्टर मनी भाई देसाई यांनी गौरव पत्र देऊन सन्मान केलेला आहे. डॉक्टर रवींद्र भोळे उरुळी कांचन येथे डॉक्टर रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र द्वारे अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा देत आहेत. आणि एक गरीब लोकांना ते विविध हॉस्पिटल मधून सहकार्य मिळवून देत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पारधी समाजातील लोकसेवक लेखक भास्कर भोसले यांनी वाळवंटातील समाजसेवी सर्व हे पुस्तक डॉक्टर रवींद्र मुळे यांच्या जीवनावर आधारित प्रकाशित केलेले आहेत. डॉक्टर रवींद्र भोळे यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन स्वर्गीय बाळासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुणे येथे झाले आहे. डॉ. रवींद्र भोळे यांना पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई,मोहन धारिया ,बाळासाहेब भारदे, मधुकरराव चौधरी, बानू कोयजी, महात्मा गांधीजींच्या स्नुषा निर्मला बेन गांधी ,नागपूर येथील स्व मग झिटे, व्ही भी कोलते, अशा महा न कृषीतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या हस्ते डॉ.रवींद्र भोळे यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना आतापर्यंत 407 नॅशनल इंटरनॅशनल स्टेट अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यांना अनेक मल्टिपल वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार अपंग सेवक डॉक्टर रवींद्र भोळे हे पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई प्रतिष्ठान, डॉक्टर मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट निळकंठेश्वर भुलेश्वर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे सरस्वती प्राथमिक शाळा उरुळी कांचन या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे सरदार पटेल लेवा पाटील समाज मंडळ उरुळी कांचन ,राष्ट्रीय एल्पीसमाज फाउंडेशन ,रवींद्र शांतिनिकेतन ग्रंथालय ,अहिल्या सार्वजनिक ग्रंथालय इत्यादी संस्थांमध्ये संस्थापक म्हणून कार्य केलेले आहे. डॉ.रवींद्र भोळे महावीर मूकबधिर निवासी विद्यालय उरुळी कांचन, महावीर मतिमंद निवासी विद्यालय ,संत गजानन मतिमंद विद्यालय ,सेवाधाम निवासी मतिमंद विद्यालय ,गोयल मतिमंद निवासी विद्यालय, ज्ञानगंगोत्री मतिमंद विद्यालय, छत्रपती निवासी मतिमंद विद्यालय ,मतिमंद विद्यालय कोल्हापूर पी एन पाटील मलोवी मंच कोल्हापूर ,हिंदुस्थान आश्रम शाळा अ नगर, क्रांतीज्योत महात्मा फुले बालकाश्रम भांडगाव अनगर ,श्री सेवा बालकाश्रम वर्धा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालय वर्धा ,शारदा मूकबधिर विद्यालय वर्धा ,संत यादव बाबा हायस्कूल शिंदवणे, भारतीय प्रौढ शिक्षण संस्था दिल्ली या संस्थांमध्ये कार्य करीत असून संस्थांचे सल्लागार सदस्य आहेत.
त्याचप्रमाणे डॉक्टर रवींद्र भोळे यांनी नवनिर्धार मानव सेवा ट्रस्ट वर्धा स्वामी विवेकानंद भाऊ उद्देश्य संस्था वर्धा ,ओम बहु संस्था यवतमाळ या संस्थांमध्ये सल्लागार म्हणून कार्य केलेले आहे. तसेच डॉक्टर रवींद्र भोळे हे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश एस एस आय एफ जयपुर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, मार्गदर्शक सल्लागार ट्रस्टी अखिल भारतीय लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ अकोला, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रोजेक्ट हंड्रेड रजिस्टर इन्स्टिट्यूशन दिल्ली, अध्यक्ष राम कृष्ण हरी वारकरी मंच हवेली, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य बुलढाणा, नॅशनल मोडरेटर ह्यूमन राईस जस्टीस फेडरेशन, ट्रस्टी अभिनव बाल लेख रजिस्टर दिल्ली, वैद्यकीय विभाग प्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य, इत्यादी संस्थांमध्ये कार्यरत असून ते लेवा पाटीदार मंडळ पिंपरी चिंचवड, समताभात्रू मंडळ पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार मंडळ, भ्रतृ मंडळ पुणे या संस्थांमध्ये सभासद सदस्य असून विविध कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहेत. डॉक्टर रवींद्र गोळे हे अस्मिता नागरी सहकारी पतसंस्थेचे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर रवींद्र भोळे यांनी स्वीकृत सदस्य व पदाधिकारी म्हणून तंटामुक्त समिती आरोग्य समिती उरुळी कांचन रुग्ण हक्क कल्याण समिती पी एस सी उरुळी कांचन पुणे जिल्हा शैक्षणिक संशोधन समिती जिल्हा परिषद पुणे या शासकीय संस्थांमध्ये कार्य केलेले आहे. डॉक्टर रवींद्र भोळे यांनी निष्काम कर्मयोगी व रचनात्मक कार्य केलेले असून त्यांनी रुदय शस्त्रक्रिया आर्थिक मदत, एसटीबी कॅन्सर कुष्ठरोग निर्मूलन कार्य, भूकंप व नैसर्गिक आपत्ती मदत कार्य, व्यसनमुक्ती व प्रवचनाद्वारे प्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता परिषद गांधीवादी मेळावे, मूकबधिर मतिमंद अपंग सेवा पुनर्वसन कार्य, साई स्वाध्याय मंडळातर्फे संस्थांना आर्थिक मदत मिळवून देणे, वृक्षारोपण पर्यावरण संतुलन व ग्राम स्वच्छता अभियान कार्य, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्यासाठी व स्फूर्ती मिळावी म्हणून पद्मश्री डॉक्टर मनीबाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार, भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल राष्ट्र रत्न पुरस्कार, एपीजे अब्दुल कलाम राष्ट्ररत्न पुरस्कार, इत्यादी आतापर्यंत 25000 कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन राष्ट्र सेवेत व नवीन हिंदुराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केलेले आहे. डॉ.रवींद्र भोळे यांनी दररोज दहा पेशंट मोफत ट्रीटमेंट दिलेले आहे आतापर्यंत 35 वर्षांमध्ये त्यांनी दीड लाख रुग्णांना मोफत औषधोपचार केलेले आहेत. डॉक्टर रवींद्र भोळे महाराष्ट्रातील एक आध्यात्मिक महान संत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

चौकट
भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या समर्पित भावनेने सामाजिक कार्य केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या पद्मश्री पुरस्कार 2024 करता डॉक्टर रवींद्र भोळे यांचे नामांकन झालेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *