महामानवाला
वह्या, पेन पुस्तकांनी अभिवादन उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद
महामानव प्रतिष्ठानच्या स्टॉलवर राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
![]()

महामानवाला
वह्या, पेन पुस्तकांनी अभिवादन उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद
महामानव प्रतिष्ठानच्या स्टॉलवर राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
मुंबई-०७-(प्रतिनिधी)
महामानव प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेने एक वही एक पेन अभियानांतर्गत चालविलेल्या
-महामानवाला देवू या वह्या पेन पुस्तकांची आदरांजली या उपक्रमाला चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर यांच्यासह आंबेडकर परीवार व विविध मान्यवरांनी यावेळी सदर उपक्रमाला भेट देवून अभियानच्या कामाचे कौतुक केले़
महामानव डाॅबाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरीनिर्वाणदिनानिमित्त महामानवाला वह्या पेन आणि पुस्तकांनी अभिवादन करावे असे आवाहन महामानव प्रतिष्ठानच्या वतीने व एक वही एक पेन अभियानांतर्गत करण्यात आले होते मागील आठ वर्षांपासून चालविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी महामानव प्रतिष्ठान तसेच भारतीय बौध्द महासभा यांनी चैत्यभूमी येथील भैय्यासाहेब आंबेडकर स्मृती स्मारक येथे ५ व ६ डिसेंबर २०२३ रोजी स्टाॅल लावण्यात आला होता़, आंबेडकरी अनुयायांनी सदर स्टाॅलला भेट देवून मोठ्या प्रमाणावर वह्या,पेन पेन्सिल, रबर फोल्डर आदी शैक्षणिक साहीत्य देवून नंतर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी येथे अभिवादन केले,यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना शालेय साहीत्याचे वाटप करण्यात आले.
भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॅ भीमराव आंबेडकर व एस. के भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ५ डिसेंबर रोजी या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ऱाहुल नार्वेकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर,मनीषाताई आंबेडकर,
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर,बाबासाहेबांची नात रमाताई तेलतुंबडे, आनंद तेलतुंबडे या आंबेडकर परीवारासह , मुंबई काॅग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड,गुजरातचे माजी आमदार जिग्नेश मेवानी, हास्यजत्रा फेम सुप्रसिध्द कलाकार अरूण कदम, भीम आर्मीचे अशोक कांबळे, सीताराम गंगावणे,सुनील थोरात, विविध राजकीय सामाजिक कामगार,मेडीकल क्षेत्रातील मान्यवरांनी या एक वही, एक पेन अभियानच्या उपक्रमांचे कौतुक करीत पाठींबा दिला,
महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात प्रतिष्ठानचे राजेश उबाळे,अनिल भिसे राजू लोखंडे शंकर कांबळे, सुमीत दाभाडे, प्रतिमा दाभाडे ,मनोज ईंगळे,सुनील वाकोडे, सुबोध झनके, स्वप्नील झनके,संगीता दौंदे भास्कर गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले उपक्रमाचे कौतुक
समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी राज्य सरकार विविध योजना आखत आहे ़ईयत्ता पहीली ते आठवीपर्यतच्या विद्यार्थ्यांना गणवेश व सर्व शैक्षणिक वस्तूचे वितरण हा या योजनेचाच भाग आहे असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले , नागपुर अधिवेशनाच्या पुर्वतयारी मुळे महामानव प्रतिष्ठानच्या एक वही एक पेन अभियान उपक्रमास उपस्थित राहणे शक्य झाले नाही अशी खंत व्यक्त करतानाच प्रतिष्ठानने चालविलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत केसरकर यांनी या अभियानसाठी शुभेच्छा दिल्या .

