1 min read

समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना पेटंट जाहीर

Loading

समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना पेटंट जाहीर
पेटंट सर्व घटकांसाठी उपयुक्त – प्रा. डॉ.राहुल निकम आणि प्रा. डॉ.जगदीश सोनवणे. प्रा.डॉ.जगदीश सोनवणे(समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर),प्राचार्य डॉ.पी. एस.पाटील (समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर)प्रा.डॉ.राहुल निकम(समाजकार्य महाविद्यालय,चोपडा), प्रा.डॉ.घनश्याम जगताप (समाजकार्य महाविद्यालय,नासिक)प्रा.डॉ.निलेश गायकवाड (समाजकार्य महाविद्यालय,तळोदा) यांनी संयुक्त प्रयत्नातून हवेतील प्रदूषण ओळखणाऱ्या यंत्राची प्रतिकृती तयार केलेली आहे. या प्रतिकृतीला भारत सरकारने पेटंट म्हणून मान्यता दिलेली आहे. वर नमूद केलेल्या सर्व प्राध्यापकांनी समाजकार्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणाबद्दल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांबद्दल गांभीर्याने विचार केला. मानव समाजाला प्रदूषणाच्या या गंभीर समस्येतून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल याचा गांभीर्याने विचार करत असताना त्यांनी हवेतील प्रदूषणाची पातळी शोधणाऱ्या यंत्राची प्रतिकृती तयार केली. ही प्रतिकृती बंद खोलीतील किंवा नियंत्रित वातावरणातील प्रदूषण ओळखणाऱ्या यंत्राची प्रतिकृती आहे. या प्रतिकृतीच्या माध्यमातून बंद खोलीतील किंवा नियंत्रित वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण आणि त्यावर उपाययोजना हे निश्चित करता येणार आहे. या प्रतिकृतीचा उपयोग वातावरणातील प्रदूषण कमी करून मानवी जीवन अधिक सुखकारक आणि प्रदूषणमुक्त करण्याकरता भविष्यात होणार आहे . समाजकार्य महाविद्यालयातील या प्राध्यापक चमूने या पूर्वी प्रकाशित केलेल्या शोध निबंधाला एक पब्लिश पेटंट म्हणून भारत सरकारकडून सामूहिक रित्या जाहीर केले आहे. या प्राध्यापक चमुचे हे दुसरे पेटंट आहे. याबद्दल अरुण गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य,मुंबई), आशिष गुजराथी, सौ.पुनम गुजराथी,सौ.अश्विनी गुजराथी, सर्व समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *