राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे क्रीडामंत्री ना.संजय बनसोडे यांचे हस्ते उदगीर येथे शानदार उदघाटन :
![]()
राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे क्रीडामंत्री ना.संजय बनसोडे यांचे हस्ते उदगीर येथे शानदार उदघाटन :
लातुर प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, लातूर जिल्हा क्रीडा कार्यालय, लातूर जिल्हा क्रीडा परिषद व लातूर जिल्हा डॉजबॉल असोसिएशनतर्फे दि.९ ते १२ डिसेंबर दरम्यान लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस शानदार सुरवात झाली स्पर्धेचे उदघाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजयजी बनसोडे यांनी आल्म्पियन पदक विजेते खेळाडू स्व.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून तसेच दिप प्रज्वलन करून केले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर, गटविकास अधिकारी सुरडकर, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव खेलरत्न व शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे, राज्य तांत्रिक समिती प्रमुख सयाजीराव तिरमके, लातूर जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रा ओमराजे साकोळकर यांची उपस्थिती होती उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले प्रारंभी खेळाडूंनी संचलनद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली लातूर येथील राष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू प्रतिक शिंदे याने खेळाडूंना शपथ दिली याप्रसंगी देवर्जन येथील गंगाधर साकोळकर पाटील विद्यालयाचे विद्यार्थींनी लेझीमनृत्यद्वारे गणेश वंदना तर निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या चमूने डॉजबॉल नृत्य व स्पोर्ट्स डान्स सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली क्रीडामंत्री ना. संजयजी बनसोडे यांनी आपल्या मनोगतातून विविध क्रीडा स्पर्धा आयोजन, खेळाडू योजना व क्रीडा संकुल वाढीव निधी, खेळाडू पुरस्कार योजना यासह सविस्तर मार्गदर्शन करून डॉजबॉल खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव (जळगाव), महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे तांत्रिक समिती प्रमुख सयाजीराव तिरमके (सातारा) राष्ट्रीय खेळाडू अशोक बुकटे (लातूर) यांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजयजी बनसोडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर यांनी केले स्पर्धेत राज्यातील आठही विभागाचे १७ व १९ वयोगटाचे मुले मुली संघ सहभागी झाले आहेत तांत्रिक समितीत कैलास करवंदे (बुलढाणा) अतुल पडोळे (अमरावती) लातूर जिल्हा डॉजबॉल असोसिशनचे सचिव अशोक परीट, गिरीश पाटील (जळगाव) तर पंच म्हणून उमेश बोढरे (सातारा) शरद बढे (धाराशिव) आकाश मोटघरे, दिनेश धारपवार व पवन धनकर (वाशिम) राहुल साळुंखे, सचिन महाजन व गिरीश महाजन (जळगाव) अमित आग्रे (रत्नागिरी) सुहास कुलकर्णी (कोल्हापूर) गिरिराज गुप्ता (यवतमाळ) बंडू मुरकुटे (बीड) हे काम पहात आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी लातूर जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव अशोक परीट तथा पदाधिकारी सदस्य, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, लातूर क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे व चंद्रकांत लोदगेकर, कैलास लटके यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.




