अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी 2024 रोजी कलानंद बाल मेळावा होणार…
![]()
अमळनेरला कलानंद बालमेळाव्याचे आयोजन….अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी 2024 रोजी कलानंद बाल मेळावा होणार…
सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनीं संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेरला कलानंद बाल मेळावा
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जिल्हा जळगांव येथे 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या तीन दिवसात होत आहे.. संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी 2024 रोजी कलानंद बाल मेळावा संपन्न होत आहे. या संमेलनातील कलानंद बाल मेळाव्यात बालनाट्य काव्यवाचन, नाट्यछटा, नाट्य प्रवेश, समूहगीत, कथाकथन ,सादरीकरण करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे तसेच कलानंद बाल मेळाव्याला उद्घाटक म्हणून मुलगा मुलगी यांची निवड करण्यात येणार आहे..
कलानंद बाल मेळाव्याचे उद्घाटक मुलगा मुलगी यांची निवड करण्यासाठी ज्या मुलामुलींचे कविता कथा आणि इतर साहित्य प्रकाशित झाले असेल त्या प्रकाशित झालेल्या साहित्याला नामवंतांनी गौरविण्यात असेल अथवा एखाद्या साहित्यिक पुरस्कार मिळाला असेल असे इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रसाद सविस्तर माहितीसह पुराव्यासह मंडळाकडे 20 डिसेंबर 2023 पर्यंत पाठवावेत…
ज्या विद्यार्थ्यांना नाट्य प्रवेश नाट्यछटा सादर करायचे असतील त्यांनी 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता साने गुरुजी हायस्कूल एसएम गोरे सभागृहात अमळनेर येथे आपले प्रवेश सादर करावेत त्यातून निवड चाचणी होऊन कलानंद बालमित्र सादरीकरणासाठी संधी मिळेल..
ज्यांना कलानंद बालमेळाव्यात मंच व्यवस्थापनास सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपापली नावे मंडळाकडे २० डिसेंबर 2023 पर्यंत पाठवावीत त्यांची कार्यशाळा घेतली जाईल व त्या कार्यशाळातून निवड करून कलानंद बाल मेळाव्यात मंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकण्यात येतील..
कलानंद बालमेळाव्यात उद्घाटन सत्रात व समारोप सत्रातील समूहगीतातील गायनाची निवड चाचणी 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता साने गुरुजी हायस्कूल एस एम गोरे सभागृहात अमळनेर येथे होईल व त्यातूनच निवडक मुलांना बाल मिळाव्यात समूहगीतात खरा तो एकची धर्म व बालसागर भारत हो या गाण्यांवर समुहगीत सादर करण्यासाठी संधी मिळेल..
इतर अधिकार कलानंद बाल मेळावा आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आले असून अधिक माहितीसाठी कलानंद बालमेळावा समिती प्रमुख तसेच मराठी वांग्मय मंडळ अमळनेर येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे…
ज्या विद्यार्थ्यांना बालमेळाव्यात काव्य वाचन करायचे आहे या विद्यार्थ्यांनी आपली स्वलिखीत कविता घेऊन 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता साने गुरुजी हायस्कूल एस एम गोरे सभागृह अमळनेर येथे उपस्थित रहावे..
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. कलानंद बालमेळावा साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2023 आहे त्यासाठी मराठी वाग्डमय मंडळ नांदेडकर सभागृह न्यू प्लॉट अमळनेर जिल्हा जळगाव येथे पाठवावे.. असे आवाहन कलानंद बाल मेळाव्याचे समन्वयक एकनाथ आव्हाड, अध्यक्ष डॉ अविनाश जोशी मराठी वाड्मय अमळनेर, उषा तांबे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, संदीप घोरपडे प्रमुख कलानंद बाल मेळावा, भैय्यासाहेब मगर, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे यांनी केले आहे..

