पेन्शन जनक्रांती महामोर्चा चलो नागपूर
महामोर्चात शिक्षक परिषदेचा सहभाग
![]()

पेन्शन जनक्रांती महामोर्चा चलो नागपूर
महामोर्चात शिक्षक परिषदेचा सहभाग
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)- जुनी पेन्शन मागणीसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 12 डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे .महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे काढण्यात येणाऱ्या महामोर्चात शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी केले आहे 31 ऑक्टोबर 2005 चा वित्त विभाग शासन निर्णयाद्वारे एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेले शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद झाली तसेच एक नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आले परंतु शाळा 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आली अशा कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन डावलण्यात आली. कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करणारा हा काळा शासन निर्णय रद्द करावा अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने घेतली आहे असे राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू म्हणाले. तत्कालीन शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार ,भगवानराव साळुंखे, व स्वर. रामनाथ दादा मोते यांनी सभागृहात अनेक वेळा जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून आवाज उठवला अनेक आंदोलन केली तरी शासनाने दखल घेतली नाही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मा. शिक्षक आमदार नागो गाणार, भगवानराव साळुंखे राज्याचे अध्यक्ष वेनुनाथ कडू, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी व कार्यवाह राजकुमार बोनकिले यांच्यासह संपूर्ण राज्यातून परिषदेचे अनेक पदाधिकारी कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. कोकण विभागाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील कार्यवाह लक्ष्मण वालगुडे व कोषाध्यक्ष पी. एम. पाटील यांच्यासह अनेक शिक्षक विभागातून जाण्याच्या तयारीत आहेत.

