अनिल बोरनारे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन,मुंबई शिक्षक मतदारसंघातील कार्याचा अहवालात समावेश
![]()

अनिल बोरनारे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन,मुंबई शिक्षक मतदारसंघातील कार्याचा अहवालात समावेश
मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या व एकूणच शिक्षण व्यवस्थेतील समस्यांबद्दल नेहमीच आवाज उठविणारे व मुंबईतील शेकडो शिक्षकांचे प्रश्न सोडविणारे शिक्षक संघटनेचे व भाजपाचे नेते अनिल बोरनारे यांच्या कार्य अहवालाचे नुकतेच प्रकाशन झाले. या अहवालाची प्रत नुकतीच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना बोरनारे यांनी सुपूर्द केली या अहवालात बोरनारे यांच्या कार्याचा आढावा घेतला असून मुंबईतील प्रत्येक शाळेतील शिक्षकांपर्यंत अहवाल पोहचवला जाणार आहे
अनिल बोरनारे यांनी शिक्षकांचे शेकडो प्रश्न सोडविले असून त्यात कायम विनाअनुदानित मधील कायम शब्द वगळला, विना अनुदानित शाळांना अनुदान मिळविण्यासाठी केलेल्या आंदोलनात यशस्वी सहभाग,
महिला शिक्षिकांना केंद्राप्रमाणे बाल संगोपन रजा, केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील ९४ हजार शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण, राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना १ तारखेला वेतन देण्यास शासनाला भाग पाडले, ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळवून दिली, शासनाला महागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्याबाबत भाग पाडले,
राज्यातील शिक्षकांचे शाळा सुटल्यावर विनाकारण थांबविणे बंद केले, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग मधील शिक्षकांनी प्लॅन मधील १२ कोटी रूपयांची थकबाकी मिळवून दिली, सरकारी कर्मचाऱ्यांसोबत प्रथमच शिक्षक-शिक्षकेत्तरांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत यशस्वी पाठपुरावा, मुंबई विभागातील १२०० शिक्षकांना ४६ कोटी रूपयांची थकबकी मंजूर करून घेतली, सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणाचे राष्ट्रीय काम करणाऱ्या शिक्षकांना मानधनाचे ३४ कोटी रुपये मिळवून दिले, सेवेत असतांना मृत्यू झालेल्या ६८५ शिक्षकांच्या कुटुंबियांना वित्त विभागाकडून मदत मिळवून दिली, मुंबईतील उर्दु माध्यमातील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू केले, मुंबई व कोकण विभागातील शिक्षकांचे वेतन निश्चितीचे काम सुरू केले. मुंबईतील ११४२ अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन केले, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड मधील शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षणाधिकाऱ्यांसोबत सह-विचार सभांचे आयोजन.
वेतन निश्चितीमधील भ्रष्टाचार थांबविला, एलिमेंटरी व इंटरमिजीएट प्रस्तावांना मुदतवाढ मिळवून दिली, बालसंगोपन रजा महिला शिक्षकांना नाकारणाऱ्यांना रजा देण्यास भाग पाडले, मुंबई कोकण विभागातील १० वी १२ वीच्या शिक्षकांना निवडणूक कामांमधून वगळले, अर्धवेळ शिक्षकांना ग्रंथपालांना ७ वा वेतन आयोग मिळवून दिला, शिक्षण उपसंचालक, संचालक, आयुक्त, एस.एस. बोर्ड अधिकाऱ्यांसोबत सहविचार सभांचे आयोजन, शिक्षकांचे मेडीकल बिले, पी.एफ. वरील कर्ज तातडीने मंजूर केली.
मुंबई व कोकण विभागातील शेकडो सेवा शर्तीच्या संदर्भातील शेकडो प्रश्न सोडविले, राज्यातील शिक्षकांना रोज लेसन प्लॅन काढण्याची सक्ती मागे घेण्यास भाग पाडले, मतदारयाद्या पुनर्निरीक्षणातून शिक्षकांची सुटका केली, शिक्षकांची भरती बंदी उठविली, बोर्डाचे पेपर तापसणार्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळले,
सिंधी माध्यमातील अतिरिक्त शिक्षकांचे हिंदी माध्यमात समायोजन करून घेतले,
शिक्षकांना हज यात्रेसह इतर धार्मिक यात्रांसाठी पि एफ मधून रक्कम काढण्यास मंजुरी मिळविली, शिक्षकांची विनाअनुदानित काळातील सेवा ग्राह्य धरण्यासाठी यशस्वी पाठपुरावा, ५० हजार शिक्षकांना फायदा मिळवून दिला. भरतीबंदी मधून गणित, इंग्रजी व विज्ञान विषय शिक्षकांच्या मान्यता मिळवून दिल्या, जनगणनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना बदली रजा, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, गुन्ह्याच्या पंचनाम्यातून शिक्षकांना वगळले
शिक्षण सेवकांची नियमबाह्य करकपात बंद केली, बंद झालेले अर्धवेळ ग्रंथपालांचे वेतन सुरू केले, अपंग शिक्षकांना उपकरणे खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंतची मदत मिळवून दिली, प्लॅन मधील शिक्षकांचा वेतन प्रश्न सोडविला, एमएमआरमधील २७ गावांमधील शिक्षकांना ३० टक्के घरभाडे भत्ता मिळविण्यासाठी संघर्ष, ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील शाळांचा दोन वर्षांचा मेहनताना मिळवून दिला, शिक्षकांचे टीईटी परीक्षेचे मानधन मिळवून दिले, राज्यातील शिक्षकांना दरमहा सॅलरी स्लिप देणे बंधनकारक केले, कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिकांचा प्रश्न मार्गी लावला, रात्र ज्युनिअर कॉलेजचे बंद झालेले वेतन सुरू केले, निवडणूक अधिकाऱ्यांनी रिझर्व शिक्षकांचे थांबविलेले मानधन मिळवून बोरनारे यांनी मिळवून दिले आहेत

