ज्ञानाबरोबरच शील सांभाळा शीलाबरोबर स्वाभिमान जपा -डॉ.प्रा.सत्यजित साळवे
![]()

ज्ञानाबरोबरच शील सांभाळा शीलाबरोबर स्वाभिमान जपा -डॉ.प्रा.सत्यजित साळवे
असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. प्रा.सत्यजित साळवे,कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे पर्यवेक्षक एल.जे. पाटील, संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी,मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, एल.जे भुगवड्या,सांस्कृतिक मंडळ प्रमुख के बी तायडे,वृषाली चौधरी,अनिता पाटील यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी गुंजन वानखेडे,प्रणित वानखेडे,विशाखा भोळे,सुहानी बिऱ्हाडे,नूतन वाणी,भूमिका माळी तृप्ती कोळी, आरजू पिंजारी,ओम सपकाळे,खुशी शिंदे,श्रद्धा शिंपी, जान्हवी जाधव,खुशी शिंदे, संघदीप मोरे,योजना वाणी,प्रीती पाटील, मोहिनी पाटील,लोकेश नाथ,समीक्षा सोनवणे,सृष्टी डोळसे, धनश्री वाणी या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. लीना सोनवणे व दिक्षा सोनवणे,जयश्री जाधव, पल्लवी चौधरी व मैत्रिणी या विद्यार्थिनींनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीत गायन केले. एल .जे.भुगवड्या,अनिता पाटील या शिक्षकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राविषयी थोडक्यात माहिती सांगितली.प्रमुख पाहुण्यांचा परिचय एस डी कचरे, प्रास्ताविक वृषाली चौधरी, सूत्रसंचालन तृप्ती बिऱ्हाडे (विद्यार्थिनी) तर आभार मिताली भारुळे हिने मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे उपस्थिती लाभली.

