राज्य मागासवर्ग आयोगांच्या सदस्यांवर दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी
![]()
राज्य मागासवर्ग आयोगांच्या सदस्यांवर दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी
छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी संघटनांच्या वतीने विभागीय ऐकताच निवेदन निवेदन

छत्रपती संभाजी नगर:
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांवर मंत्री व अधिकारी दबावतंत्राचा वापर करत लुडबुड करत आहेत. आत्तापर्यंत आयोगाच्या चार सदस्यांनी राजीनामा दिला आहे आणि आता आयोगाचे अध्यक्ष निरगुडे हे ही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकताच आयोगाचे सदस्य ऍड बी एल सगर किल्लारीकर व श्री लक्ष्मण हाके यांनी मंत्र्यांच्या व सरकारी अधिकारी यांच्या दबाव व लुडबुडीला कंटाळून व पारदर्शी, निपक्षपातीपणे काम करता येत नसल्यामुळे, पुरेसा निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून दिला जात नाही. ओबीसी आयोगाच्या कामकाजात राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांचा व न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांचा हस्तक्षेप वाढला आहे. आमच्या सल्ल्यानुसार अहवाल तयार करण्यास भाग पाडले जात आहे. म्हणून आपल्या सदस्य पदांचा राजीनामा दिला आहे. या घटनेचा ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथील संघटनांच्या वतीने संत सावतामाळी मंदिरात बैठक घेण्यात आली . त्यानुसार आज विभागीय आयुक्त कार्यालयास ओबीसी संघटनांचे वतीने निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात लुडबुड करून राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या मंत्र्यांची नावे जाहीर करून त्यांचे राजीनामे घ्यावेत. आयोगाच्या घटनात्मक अधिकारात बेकायदेशीर हस्तक्षेप केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी. तसेच राज्य मागासवर्ग आयोगास स्वायत्त, पारदर्शी, निपक्षपातीपणे पद्धतीने काम करण्यास व सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी आयोगाला पुरेसा निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या ओबीसी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. जर या मागण्या मान्य न झाल्यास ओबीसींच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही बैठकीत देण्यात आला. निवेदन देताना ऍड. महादेव आंधळे, एन. आय. काळे, प्रभाकर गायकवाड , सुरेश आगलावे आदींची उपस्थिती होती.

