दिव्यांग मदत ग्रुप शहापूर यांच्या वतीने संपादक डॉ. किशोर पाटील यांना “प्रसिद्धी नायक” पुरस्कार प्रदान!
![]()


दिव्यांग मदत ग्रुप शहापूर यांच्या वतीने संपादक डॉ. किशोर पाटील यांना “प्रसिद्धी नायक” पुरस्कार प्रदान! ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी)दिव्यांग मदत ग्रुप शहापूर यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील दिव्यांगोत्सव डिसेंबर २०२३ कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी अन्नपूर्ण लॉन्स (शेटे) शहापूर सापगाव रोड येथे करण्यात आले होते, सदर कार्यक्रम दिव्यांग मदत ग्रुप शहापूर,अपंग विकास महासंघ शहापूर व विश्वजा बहुउद्देशीय संस्था शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते, त्यामध्ये दिव्यांग विवाह सोहळा व कन्यादान, दिव्यांगांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रोजगार मेळावा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, विद्यार्थी दत्तक योजना, विविध दिव्यांगांचा सन्मान व सत्कार सोहळा अशा प्रकारचे आयोजन करण्यात आले होते,
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष तथा मुरबाड विधानसभेचे आमदार श्री.किसन कथोरे, समाजसेवक भरत पाटील हरिभक्त पारायण कैलास महाराज निचिते, समाजसेवक रवींद्र चंदे, अशोक शेटे, विवेक नार्वेकर ,अशोक बसवंत, अशोक ईरनक, सुधीर शेलार, अविनाश शिंगे, सुरेश विशे, राजेश निमसे, गोविंद व्यास, अविनाश वेखंडे, किशोर चेन्न, अनिल धारवणे, संतोष दवणे, हरेश साबळे,रवींद्र सोनावळे, राजेश जागरे, वसंत कुमार पानसरे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिक उपस्थित होते,
यावेळी आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते प्रतेज दिव्यांग नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले,
त्याचप्रमाणे १८ पत्रकारांना प्रसिद्धी नायक २०२३ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच दिव्यांग उद्योजक म्हणून जयवंत सोकांडे व शितल गुरुनाथ भोईर यांना सन्मानित केले तर दिव्यांग पालकत्व सन्मान म्हणून काळुबाई गोपाल साबळे व शितल सेवक तपासे यांना सन्मानित केले त्याचप्रमाणे दिव्यांग मित्र म्हणून गोविंद व्यास, ब्रिज किशोर परदेशी व यशोदा वासुदेव कातकरी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, यानंतर दिव्यांग यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला,
यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की तुम्ही कुठेही मला शासकीय जागा दाखवा त्या ठिकाणी तुमच्यासाठी पाच कोटीची मदत माझ्याकडे मंजूर केलेली आहे ती लगेच तुम्हाला सुपूर्त करून देईन, आपले कोणतेही काम असू दे ,तुम्ही माझ्याकडे या मी तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहीन जेणेकरून माझा दिव्यांग बांधव कुठेही मागे पडता कामा नये असे मनोगत व्यक्त करताना सांगितले.
हे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शिवाजी सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव श्री विश्वजीत घायवट यांनी केले, तसेच या दिव्यांग महोत्सव २०२३ कार्यक्रमात आपण गेली ३० वर्ष करत असलेली निःस्वार्थी पत्रकारीता आणि आम्हा दिव्यांगांच्या प्रत्येक कार्यक्रमाची दखल घेत आपण आम्हाला आपल्या प्रसिद्धीपत्रकामार्फत प्रसिद्धी दिलीत त्या अनुषंगाने आमच्या कडून प्रसिद्धी नायक या पुरस्कारासाठी आपली निवड करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अग्रगण्य मराठी दैनिकाचे संपादक म्हणून आपले नाव सर्वप्रथम घेतले जाते, म्हणूनच आपला सन्मान राज्यपाल यांच्या हस्ते राज भवनात करण्यात आला. दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पत्रकारांनी पाठवलेल्या सर्व बातम्यांना निस्वार्थपणे प्रसिद्धी देऊन पत्रकारितेचा मान त्यांनी उंचावला आहे , त्याचप्रमाणे त्यांचे भारता बाहेरील अमेरिका ,ब्राझील, मध्य प्रदेश या ठिकाणचे प्रतिनिधी ही त्यांना बातम्या पाठवत असतात त्यामध्ये सौ.संगीता तोडमोल अमेरिका, डॉ.दीप्ती भदोरिया ब्राझील, डॉ.
संतोष भार्गव इंदोर(मध्य प्रदेश)
यांचा समावेश आहे, त्यामुळे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांचे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातून इतर देशात देखील स्वराज्य तोरण या दैनिकाचे नाव रोशन केले आहे,
याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो म्हणूनच आम्ही आपणास या दैनिकाचे संपादक म्हणून व निस्वार्थ पत्रकार म्हणून “प्रसिद्धी नायक” पुरस्कार २०२३ देऊन विविध मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित केले.
आपल्या या निस्वार्थ कार्यास आमचा सलाम व आपले आमच्या सर्व संस्थांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, दैनिक स्वराज्य तोरण मित्र परिवार, स्वामीनारायण ट्रस्ट, रोटी डे ग्रुप कल्याण, चंद्रानंद कृषी पणन व समाज कल्याण संस्था भिवंडी, स्वराज्य तोरण चारिटेबल ट्रस्ट
या सर्व संस्थांनी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

