दिव्यांग विषयी सहानुभूती नव्हे तर आपुलकी राहावी ;- तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी
![]()


दिव्यांग विषयी सहानुभूती नव्हे तर आपुलकी राहावी ;- तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी
धरणगाव प्रतिनिधी -पी.डी.पाटील
धरणगांव – दिनांक ३ डिसेंबर, जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन सामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवशी दिव्यांग व्यक्तिच्या सामाजिक राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी शासन विविध स्तरावर उपक्रम राबवते. त्यामध्ये विविध स्पर्धा, भाषणे, प्रभात फेऱ्या, पथनाट्ये अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करुन दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहित केले जाते. दिव्यांग (अपंगत्व) असणारी व्यक्ती म्हणजे दिर्घकालीन ज्या व्यक्तींमध्ये शारिरीक,बौध्दिक,विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येतात अपंग दिनाच औचित्य साधून धरणगाव मूकबधिर विद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष धरणगाव चे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी दिव्यांग बांधवांना संबोधित करत असताना दिव्यांग साठी आवश्यक योजना पाठपुरावा करून लाभ कसा करून देता येईल याला प्राधान्य देण्यात येईल मुलाचं विकास व जडणघडण मदत करण्यासाठी प्रयत्न करेल कुटुंबात अपंग व्यक्तीला सन्मान मिळायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी हेडगेवार नगर ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित उपसरपंच यांनी अपंग ना साठी जि ही मदत लागेल ती अहोरात्र करण्यासाठी कटिबद्ध राहील यावेळी उपस्थित ऍड संदीप पाटील , धर्मराज मोरे विनोद रोकडे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील, अनंत जाधव उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन रामकृष्ण पाटील सर यांनी केले तर आभार भाडगे सर यांनी मानले

