सानेगुरुजी जयंतीनिमित्त
खान्देशात व महाराष्ट्रात 125 उपक्रम करणार-
दर्शना पवार
![]()



सानेगुरुजी जयंतीनिमित्त
खान्देशात व महाराष्ट्रात 125 उपक्रम करणार-
दर्शना पवार
अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने, सेनानी साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त खान्देशासह महाराष्ट्रात विविध उपक्रमांची आखणी साठी प्रा. डॉ.अरविद सराफ यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळात , अमळनेर येथे निर्धार बैठक संपन्न झाली, या बैठकीत जळगाव, धुळे,ऩदूरबार व नाशिक जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात
उपक्रम राबवू इच्छिणारे वीस प्रमुख सहकारी उपस्थित होते.
या निर्धार बैठकीत खान्देशात व महाराष्ट्रात 125 उपक्रम येत्या 24 डिसेंबर पासून राबविण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीच्या सुरवातीला बहीणाईच्या स्मृतींना उजाळा दिला. वाहनचालक विद्यार्थी समाजातील विविध गटात जाऊन बहीणाईच्या पुस्तिका भेट दिल्या. 3 डिसेंबर स्मृती दिनानिमित्त बहीणाईंना कृतीशील अभिवादन केले.
विविध घटकांसाठी स्पर्धा, प्रबोधनपर कार्यक्रम, नाट्य सिनेमा, साहित्य व सांस्कृतिक उपक्रमांबद्ल उपस्थित सर्वांनी अनेक सूचना व उपक्रम सूचवित उत्साहवर्धक सहभाग नोंदविला.
येत्या 24 डिसेंबर 2023 ला प्रथम नोंदणी करणाऱ्या 125, मुलां मुलीसाठी ( इयत्ता 6 वी ते 9 वी) गप्पा लेखकांशी हा कार्यक्रम व प्रौढांसाठी मुलाखत अश्या भरगच्च कार्यक्रमाने सेनानी साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षांचा प्रारंभ अमळनेर येथे साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या गलवाडे बु येथील निसर्गरम्य परिसरात होणार आहे.
मानवतेचा, समतेचा व निसर्ग,पशु पक्षी यांच्यासह मानवावर प्रेम करणे हा प्रेमाचा – बंधुतेचा संदेश व कृतिशीलता वाढावी यासाठी विविध माध्यमांतून खान्देशासह महाराष्ट्रात अधिक ताकदीने पोहचण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. यासाठी स्टिकर, प्रचार पत्रक,पोस्टर, टी शर्ट , कँप, पुस्तके, प्रतिमा, पुतळा इ.साहित्य निर्मिती व उपलब्ध करणार आहोत.
साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या कामाला आतापर्यंत असंख्य दाते, मार्गदर्शक, मदतगार, सहकार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती सोबत आहेत,हे ऋणानुबंध
साने गुरुजी यांच्या 125 जंयती वर्षानिमित्त अधिक बळकट व्हावे तसेच या निमित्ताने खान्देशासह महाराष्ट्रातील जास्तीत जास्त व्यक्तींनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या कामात सहभाग,मदत व उपक्रमांमध्ये उपस्थिती द्यावी असे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.
आपणास काही सूचना करावयाच्या असल्यास वा अधिक माहिती साठी मोबाईल नंबर
9075570510,9422278419 संपर्क साधवा असे दर्शना पवार यांनी कळविले आहे…

