1 min read

इ.१०वी,१२वी पेपर तपासणी व परीक्षा कामकाज मानधनात वाढ करावी.– जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी.

Loading

इ.१०वी,१२वी पेपर तपासणी व परीक्षा कामकाज मानधनात वाढ करावी.– जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी.

जळगांव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारा संपूर्ण राज्यात दरवर्षी फेब्रुवारी/मार्च महिन्यामध्ये इ.१०वी आणि १२वीची बोर्ड परीक्षा घेण्यात येते. सदर परीक्षा केंद्रांवर काम करणाऱ्या केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, लिपिक आणि शिपाई यासारख्या शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तसेच परीक्षक व नियामक यांच्या मानधनामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून वाढ करण्यात आलेली नाही. याबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सातत्याने आग्रही भूमिका मांडत आलेली आहे. गेल्या काही वर्षांतील वाढलेली विद्यार्थी संख्या व वाढलेली परीक्षा फी तसेच बोर्डाचे परीक्षेसंदर्भातील वाढलेले अन्य शुल्क यांच्या तुलनेत मात्र सदर मानधनामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे काळानुरूप बोर्ड परीक्षा यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये येत्या बोर्ड परीक्षेच्या आधी सन्मानजनक यथोचित वाढ होणे अत्यंत गरजेचे असल्याची जळगांव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी असून प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा.सुनील सोनार (सचिव), डॉ.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी (उपाध्यक्ष), प्रा.शैलेश राणे (कार्याध्यक्ष), प्रा.डी.डी. पाटील, प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक), प्रा.राहुल वराडे (महानगराध्यक्ष), प्रा. सुधाकर ठाकूर (अध्यक्ष जळगाव ग्रामीण) यांनी तशा आशयाचे निवेदन पदवीधर आमदार श्री. सत्यजित तांबे, शिक्षक आमदार सर्वश्री.विक्रम काळे, किरण सरनाईक, किशोर दराडे यांना पाठविले असून येत्या हिवाळी अधिवेशनात सदर विषय विधिमंडळ कामकाजात मांडावा असे साकडे घातले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *