बॅ.नाथ पै विद्यालयात सायबर सुरक्षेवर जनजागृती,सायबर पोलिसांकडून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन
![]()


बॅ.नाथ पै विद्यालयात सायबर सुरक्षेवर जनजागृती,सायबर पोलिसांकडून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन
मुंबई /ठाणे(मनिलाल शिंपी) दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत असून सायबर सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांनी जागरूक असावे असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे
भांडुप येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात पोलीस विभागाच्या निर्भया स्काऊटच्या वतीने आयोजित केलेल्या सायबर सुरक्षा व गुड टच बॅड टच वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले भांडुप पोलीस स्टेशन च्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा वाघमारे व पोलीस कॉन्स्टेबल भीमा गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अनेकदा विद्यार्थी मोबाईल, संगणक आणि इंटरनेटचा वापर अधिक प्रमाणात करत असल्याने, काहीतरी चूक भूल होण्याची शक्यता असते. आणि त्याच साठी योग्य वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते.
यावेळी मनीषा वाघमारे यांनी ऑनलाईन असणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्यातील फायदे आणि सोबतच मोबाईलच्या अति वापराचे धोके समजावून सांगितले. सध्या बरेचशे व्यवहार ऑनलाईन पद्धतीनेच केले जातात. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, किती सतर्क राहिले पाहिजे हे सविस्तरपणे सांगितले. सोशल मीडिया हा जसा चांगला तसाच त्याचे दुष्परिणाम वाघमारे व गवळी यांनी सांगितले.
कोणताही व्यवहार करताना येणारा व्हेरीफिकेशन ओटीपीबाबत त्यांनी विशेष माहिती विद्यार्थ्यांना दिली.

