१०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे विजयसिंह पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार प्रदान
![]()

१०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे विजयसिंह पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार प्रदान
अमळनेर प्रतिनिधी
महात्मा फुले
पुण्यतिथी निमित्त १०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्काराचे वितरण जालना येथील जेईएस महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. राज्यभरातून या पुरस्कारासाठी 28 जिल्ह्यांमधून 28 शिक्षकांची निवड केली जाते त्यात 14 पुरुष व 14 स्त्रिया असे या पुरस्काराचे स्वरूप असते. विधी व न्याय विभागाच्या उपसचिव सायली कांबळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित व १०० शिक्षक क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष राजेभाऊ मगर यांच्या हस्ते श्री पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातून भिका यशोद चौधरी हायस्कूलचे उपशिक्षक व पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर चे संचालक विजयसिंह पवार यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. श्री पवार यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक व स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. श्री पवार हे गेल्या तेरा वर्षांपासून तालुक्यातील तरुणांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्वखर्चाने चालवीत आहेत. या मोफत मार्गदर्शनाचा फायदा तालुक्यातील शेकडो तरुणांना होत आहे. तसेच अवकाश संशोधन तारांगण अंधश्रद्धा निर्मूलन व स्पर्धा परीक्षा बाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते मोफत मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरसाळे चे अध्यक्ष संजय शिरोडे उपाध्यक्ष संतोष चौधरी सचिव जगतराव पाटील शालेय समिती चेअरमन रामलाल पाटील संचालक पोपट चौधरी गोरख पाटील युवराज पाटील विनायक पाटील रमेश जैन ललित जैन पुंजू कुंभार मुख्याध्यापक पी ए भदाणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद शिरसाळे ग्रामस्थ तसेच पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेरचे अध्यक्ष दिलीप सोनवणे चिटणीस प्रकाश वाघ व सर्व संचालक मंडळ खान्देशी अधिकारी मंडळाचे सर्व सन्माननीय अधिकारी व पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राला मार्गदर्शन करणारे सर्व तज्ञ मार्गदर्शक व विद्यार्थी जि.प शाळा आटाळे येथील मुख्याध्यापक योगेश्वर पाटील आटाळे येथील सरपंच प्रकाश पाटील व सर्व मित्र परिवार यांनी विजयसिंह पवार यांचे अभिनंदन केले आहे.

